मुंबई : २२ डिसेंबरला 'टायगर आणि झोया' पुन्हा रसिकांच्या आले आणि त्यांच्या चाहत्यांनीदेखील त्यांचे दमदार स्वागत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना युट्युबवर तुफान प्रतिसाद मिळाला. युट्युबवर त्यांनी लोकप्रियतेचे विक्रम केले. तेव्हाच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार हे निश्चित होते. अपेक्षेप्रमाणेच सलमान खानच्या ' टायगर...' ला जगभरात ओपनिंग मिळाले. 


१५० कोटींचा टप्पा पार  


पहिल्या तीन दिवसातच  सलमान खानने १०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता चौथ्या दिवसाची कमाई जाहीर करण्यात आली आहे.  


'टायगर जिंदा है' चित्रपटाने पहिल्या दिवशी  34.10 कोटी , दुसर्‍या दिवशी 35.30 कोटी , तिसर्‍या दिवशी  45.53 कोटी आणि चौथ्या दिवशी 36.54 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट एकूण १५० कोटींच्या पलिकडे गेला आहे.  तीन दिवसातच 'टायगर...' ने बॉक्सऑफिसवर ९ रेकॉर्ड्स


सुपर हीट सिक्वेल 


टायगर जिंदा है हा चित्रपट  ' एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास अली जाफरने केले आहे.  या चित्रपटामध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही सुपरहीट जोडी तब्बल ५ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसली आहे.  


एरवी ईदच्या मुहुर्तावर सलमान आपले चित्रपट आणतो. पण ' टायगर जिंदा है' हा चित्रपट ख्रिसमसला लॉन्ग विकेंड आणि त्याला जोडूनच सलमान खानचा बर्थ डे असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सलमानच्या चाहत्यांनी या सिनेमाला पसंती दिली आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढणारे चित्रपटाचे कलेक्शन सलमान खानसाठी बर्थ डे गिफ्ट ठरणार आहे.  


उद्या म्हणजेच २७ डिसेंबरला सलमान खानचा ५२ वा वाढदिवस आहे.  सलमान खान बर्थ डे स्पेशल - सलमानचे हे '१०' सिनेमे प्रदर्शितच झाले नाहीत ...