मुंबई : टायगर जिंदा है चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणार ही अपेक्षा होती. त्याचप्रमाणे २२ डिसेंबरला टायगर जिंदा है रसिकांच्या भेटीला आला आणि दमदार कामगिरी करायला सुरूवात झाली आहे.
तीन दिवसातच टायगर जिंदा है या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमावला आहे. आता या चित्रपटाची घौडदौड सुरू झाली आहे. त्यामुळे भविष्यात किती कमाई करणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरले आहे. पण ३ दिवसात बॉक्सऑफिसवरील आकड्यांनी '९' रेकॉर्ड्स केले आहेत.
सलमान खान हा बॉलिवूडचा 'दबंग स्टार' आहे हे त्याने पुन्हा सिद्ध केलं आहे. टायगर जिंदा है हा सलमानचा ११ चित्रपट १०० कोटींचा पल्ला पार करणारा चित्रपट ठरला आहे. या स्पर्धेमध्ये सलमान खान अव्वल स्थानी आहे.
टायगर जिंदा है चित्रपटाला यंदाच्या विकेंडमध्ये ११४.९३ इतके विक्रमी ऑपनिंग कलेक्शन मिळाले आहे. पहिल्या तीन दिवसात अशी कामगिरी करणारा हा पहिलाचा हिंदी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी सलमानच्या 'सुलतान'ने तीन दिवसात १०५ कोटी कमावले होते.
२२ डिसेंबरला सिनेमा रिलीज झाल्यानंतर रविवारी या कहित्रपटाने ४५.५३ कोटी कमावले. एका दिवसात इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट आहे. बाहूबली हा डब केलेला चित्रपट होता. त्याने ४६ कोटींची भारतात कमाई केली होती.
दुसर्या दिवशी या चित्रपटाने ३५.३० कोटींचीकमाई केली. त्यामुळे बाहुबली, सुलतान पाठोपाठ दुसर्या दिवशी इतकी कमाई करणारा हा तिसरा सर्वोच्च चित्रपट ठरला आहे.
एक था टायगर या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे ' टायगर जिंदा है' पहिल्या चित्रपटाने ३२.९३ कोटींची पहिल्या दिवशी कमाई केली होती. त्यापाठोपाठ टायगर जिंदा है ने ३४.१० कोटींची कमाई करत सिक्वेलला नवी आणि यशस्वी ओळख दिली आहे.
धूम ३ आणि टायगर जिंदा है हे कॅटरिना कैफच्या आयुष्यातील सर्वोच्च ऑपनिंग देणारे चित्रपट ठरले आहेत.
बाहुबली हा मूळ प्रादेशिक चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला बाजूला ठेवून २०१७ सालमध्ये सर्वोच्च ओपनिंग देणारी ही हिंदी फिल्म ठरली आहे.
यासोबतच हॉलिडे नसताना सर्वाधिक ओपनिंग देणारा, २०१७ सालातील सर्वाधिक ओपनिंग विकेंडची हिंदी फिल्म ठरली आहे.