मुंबई : 'टायगर जिंदा है' चित्रपटामध्ये सुमारे ५ वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी एकत्र दिसणार आहे. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरला आणि 'स्वॅग से स्वागत' या दोन्ही व्हिडियोंना युट्युबवर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 


'टायगर जिंदा है' चे नवे विक्रम - 


सुरूवातीला 'टायगर जिंदा है' चित्रपटचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या व्हिडीओला युट्युबवर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपटाचा ट्रेलर हा मान या चित्रपटाला मिळाला आहे. त्यापाठोपाठ आता या चित्रपटातील पहिल्या गाण्यालादेखील तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 'टायगर जिंदा है'.. चित्रपटाने केला विश्वविक्रम


'स्वॅग से स्वागत' चा नवा विक्रम 



ग्रीसमध्ये सुमारे १०० ट्रेंड डान्सरच्या सोबतीने शुट करण्यात आलेलं ' स्वॅग से स्वागत' या गाण्याने युट्युबवर धुमाकूळ घातल्याची माहिती यशराज म्युझिकच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे. 


'स्वॅग से स्वागत' या गाण्याचा व्हिडिओ  जगभरात चोवीस तासांमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला आहे. 



 



'स्वॅग से स्वागत' गाणं कोणाचं ? 



'स्वॅग से स्वागत' या गाण्यामध्ये सलमान खान आणि कॅटरिनाचा कुल अंदाज पाहता येत आहे. इरशाद कामिल यांनी लिहलेल्या या गाण्याचे संगीत दिग्दर्शन विशाल - शेखर या जोडगोळीने केले आहे. विशाल ददलानी सोबत नेहा भसीनने हे गाणं गायलं आहे. 


वैभवी मर्चंट या बॉलिवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरने  'स्वॅग से स्वागत' या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीने अनेक सायकलिस्ट, बि- बोईंग़ , बेलरीज डान्सर व सोबतीने फूटबॉलसोबत हटके स्टंट करणारे सुमारे १०० टॅलेंडेट डान्सर या गाण्यामध्ये झळकले आहेत.