COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Prathamesh Parab And Girlfriend Photo :  आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेणाऱ्या दगडूला (Dagdu) त्याची रिअर लाईफ प्राजू (Praju) मिळाली आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘टाइमपास’  (Time pass) या चित्रपटातील दगडू म्हणजे प्रथमेश परबला (Prathamesh Parab ) रिअल लाइफमधील प्राजू मिळाली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे Romance करतानाचे फोटो तुफान व्हायरल होतं आहे. टाइमपास या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला दगडूवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे. 


'ही' आहे दगडूची प्राजू?


दिवाळीनिमित्त (Diwali 2022) प्रथमेशने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे त्यानंतर त्याचा लग्नाची चर्चा रंगली आहे. कारण या फोटोमध्ये दगडूने आपल्या प्राजूसोबतचे Romance करताना दिसतं आहे. प्रथमेशने अभिनेत्री क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) हिच्याबरोबर फोटो काढले आहेत. या दोघांनीही आपल्या आपल्या इन्साग्रामवर फोटो (Instagram photo)आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 



चर्चा तर होणारच ना!


प्रथमेशने क्षितिजाबरोबर यापूर्वी पण फोटोशूट (photoshoot) केलं आहे. पण दिवाळीनिमित्त केलेल्या या फोटोशूटमध्ये त्या दोघांतील खास नातं दिसून येतं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा तर होणारच ना. त्यामुळे दादुस आता लग्न करणार म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. क्षितिजा घोसाळकर एक मॉडेल आहे. तसंच तिने 'इंडियन प्रेमाचा लफडा' या मराठी चित्रपटात काम केलं आहे.