Tina Ambani Birthday: आज टिना अंबानी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टी या इंटरनेटवर पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातून त्यांच्या आणि अनिल अंबानी यांच्या आयुष्यातीलही काही रंजक किस्से त्यांचे फॅन्स हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नाची गोष्टही सगळ्यांपेक्षा निराळी आहे. एकेकाळी लग्नाला विरोध असताना टीना अंबानी आणि अनिल अंबानी यांचे लग्न झाले. (Tina ambani and anil ambani wedding actress rakhi sawant who served food in their wedding reception on 50 rupees salary now earning in crores)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अंबानी बंधूंना जगात कोण ओळखत नाही. त्याचं नाव जगात मोठ्या क्रमांकावर आहे. आज त्यांची गणना अब्जावधींच्या मालकांमध्ये केली जाते. बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे भाऊ आणि रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी अभिनेत्री टीना अंबानी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी टीना अंबानी आणि अनिल अंबानी (Tina Ambani and Anil Ambani Marriage) यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. 


या लग्नाला अशाच एका अभिनेत्रीनं हजेरी लावली होती परंतु ती तेव्हा कोणी मोठी सेलिब्रेटी नव्हती. तर चक्क ती त्यांच्या लग्नात जेवण वाढायला म्हणून आली होती. ज्याच्यासाठी तिला फक्त 50 रूपये मानधन म्हणून मिळणार होते. पण आज हीच अभिनेत्री लाखो करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. आणि ती अभिनेत्री आहे बॉलीवूडची मोस्ट कॉट्रोव्हर्शिल आणि आयटम गर्ल राखी सावंत.  


राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते परंतु तिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या लग्नात जेवण वाढले होते. तेव्हा तिला त्या कामासाठी केवळ 50 रूपये देण्यात आले होते. राखीने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. 


आज राखी सावंत करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे आणि तिचा मुंबईच्या पॉश भागात एक आलिशान बंगलाही आहे. राखीने या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती 11 वर्षांची होती तेव्हा तिने दांडिया करण्याचा हट्ट धरला होता आणि तिची आई आणि मामाने तिचे लांब केस कापले होते. यामुळे ती दिवसभर रडत होती. राखीने सांगितले होते की त्याच दिवशी तिने ठरवले होते की ती काहीही करेल, ती तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाईल.  


राखी सावंतही आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. राखी सावंत सध्या आपल्या लग्नाच्या वादंगामुळे चर्चेत आहे. राखीच्या आईचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते.