Tappu From TMKOC Gets New Project: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) काही काळातच खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेची चर्चा आजही होताना दिसते. या मालिकेतील अनेक लहानसहान विनोदी व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना निखळ आनंद देणारी ही मालिका आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. सध्या या मालिकेतील टप्पूची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार हे लोकप्रिय आहेत. परंतु त्यातूनही टप्पूनं (Tappu) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा आता टप्पूच्या चाहत्यांसाठी एक (Bhavya Gandhi Good News) गुडन्यूज आहे. टप्पू आता एका मोठ्या आणि आगळ्यावेगळ्या चित्रपटातून दिसणार आहे. यावेळी तो लंडनमध्ये शूट करत असल्याचे दिसत होते. त्यानं त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच त्याची ही नवी कामगिरी पाहून चाहत्यांना आनंदही झाल्याचे दिसते आहे. काही दिवसांपुर्वी टप्पूनं एक फोटो पोस्ट केला होता त्यानंतर त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते; 'तू एंकल दिसतो आहे' असं टोमणे नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये लिहिले होते. परंतु आता त्या ट्रोलर्सना उत्तरच मिळाले! 


हेही वाचा - TMKOC: आता Uncle दिसतोयस; 'तारक मेहता'तल्या टप्पूचं रूप पाहून चाहते हैराण


त्याच्या या भरारीकडे पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत टप्पू म्हणजेच भव्य गांधीनं (Bhavya Gandhi in London) 9 वर्ष काम केले होते. त्यानंतर त्यानं 2017 साली या मालिकेतून काढता पाय घेतला होता. सध्या तारक मेहताची मालिका वादग्रस्त चर्चांमध्ये अडकली आहे. या मालिकेतील अभिनेत्रींनी या मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांच्यात एक वेगळीच लढाई जुंपली आहे. त्यातून टप्पूनं या मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्यानं मालिकेत परत यावं इथपासूनही विनंती केली होती. त्यांच्या पोस्टखाली त्याला मालिकेत चाहते मिस करत असल्याच्या कमेंट्सही येऊ लागल्या होत्या. 


हेही वाचा - कतरिना कैफची जुळी बहीण आहे की काय? Photo पाहून चाहते गोंधळले



सध्या भव्य गांधीनं पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तो लंडनमध्ये पिक्चर शूट करताना दिसतो आहे तिनं एका अभिनेत्रीसह आपला एक फोटो शेअर केला आहे. तो या फोटोमध्ये चहा किंवा कॉफी पिताना दिसतो आहे. त्यानंतर त्यानं शुटिंग करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात तो कॅमेऱ्याला नमस्कार करताना दिसतो (Bhavya Gandhi Upcoming Film) आहे. सध्या ही फिल्म कोणती यावर काहीही पुष्टी झालेली नाही परंतु समोर आलेल्या माहितीनुसार हार्दिक संगानी, हेमंग देव, टीकू तलसानिया, नवीन बावा आणि व्रिती वघानी आदी कलाकार त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.