शेवटच्या भागात `टॉम अॅण्ड जेरी`ची आत्महत्या ?
लहानपणी टीव्हीवर सर्वांच्या आवडीच काही असेल तर ते टॉम अॅण्ड जेरी. प्रत्येकवेळी यामध्ये कॅरेक्टर तर तेच असायचे पण वेगळी कहाणी असायची. पण बघता बघता ही मालिका बंद झाली का ? असा प्रश्न अनेकांना पडलाय. शेवटच्या वेळेस टॉम आणि जेरीला रेल्वे ट्रॅकवर पाहण्यात आले. मग या दोघांचा अंत इथेच झाला का ? असा प्रश्नही विचारला जातोय.
मुंबई : लहानपणी टीव्हीवर सर्वांच्या आवडीच काही असेल तर ते टॉम अॅण्ड जेरी. प्रत्येकवेळी यामध्ये कॅरेक्टर तर तेच असायचे पण वेगळी कहाणी असायची. पण बघता बघता ही मालिका बंद झाली का ? असा प्रश्न अनेकांना पडलाय. शेवटच्या वेळेस टॉम आणि जेरीला रेल्वे ट्रॅकवर पाहण्यात आले. मग या दोघांचा अंत इथेच झाला का ? असा प्रश्नही विचारला जातोय.
एपिसोड नंबर १०३
'एमजीएम'चे ओरिजनल 'टॉम अॅण्ड जेरी'मधील एपिसोड नंबर १०३ म्हणजे 'ब्लू कॅट ब्लूज'हा या दोघांच्या कहाणीचा अंत होता. प्रत्येक गोष्टीला अंत असतो त्याप्रमाणे ही मालिकाही संपविल्याचे म्हटले जातेय.
रेल्वेट्रॅक शेजारी ?
या भागात टॉम रेल्वे ट्रॅक शेजारी दु:खी अवस्थेत बसलाय. त्याला एक पांढरी मांजर आवडतेय. पण त्या मांजराकडे एक हिरा असतो जो तिला एका शक्तिशाली बोक्याने दिलेला असतो.
आता आपण काय करायच या विचारात टॉम असतो. तो स्वत:ला विकतो आणि गुलाम बनतो. जे पैसे मिळतात ते सर्व त्या मांजराच्या नावे करतो. पण ती मांजर काही टॉमला भाव देत नाही.
यामुळे तो दारू प्यायला लागतो. तो आत्महत्या करायला जातो पण जेरी त्याला वाचवून आणतो. असा हा पहिलाच भाग ज्यामध्ये हे दोघे एकमेकांशी भांडताना दिसत नाहीत.
दोघांची आत्महत्या
हे दोघे रेल्वे ट्रॅकवर बसलेयत. रेल्वे दिसते आणि रक्ताचे फवारे दिसू लागतात. यावरून त्यांचा मृत्यू झाला असे दिसते. पण हा त्यांचा मृत्यू नव्हता. त्यामुळे ही आवडीची मालिका पुढेही पाहता येणार आहे.
एव्हरग्रीन
'ब्लू कॅट ब्लूज' या भागात जे दाखवले ते त्यापूरतेच मर्यादित होते. त्यामुळे पुढच्या भागात दोघेही जिवंत झालेले दिसले.
त्यामुळे यापुढे तुम्हाला 'एव्हरग्रीन'चा अर्थ विचारला की न अडकता तुम्ही 'टॉम अॅण्ड जेरी' असे उत्तर देऊ शकता.