भारतात बॅन असलेले `हे` चित्रपट तुम्ही पाहु शकतात OTT वर!
Banned Films in India can watch on OTT: आपल्याला अनेकांना माहित नाही पण असे बरेच चित्रपट आहेत ज्यांच्यावर सेंसर बोर्डानं कात्री चालवली किंवा बॅन केलं, पण तेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
Banned Films in India can watch on OTT: ओटीटीवर आपल्याला वेगवेगळा कॉन्टेन्ट पाहायला मिळतो. यात असणारं कॉन्टेन्ट हे सरकारच्या सेंसरशिपच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याला कोणतीही सीमा नाही. त्यात आपल्याला अश्लीलता आणि न्यूडीटी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ओटीटी आता प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळते. मोठ्या पडद्यावर ज्या चित्रपटांवर कात्री चालवण्यात आली ते चित्रपट आपल्याला ओटीटीवर आरामात पाहता येतात. अनेक वेळा हेच चित्रपट भारतात बॅन होत असल्याचे आपण पाहतो. चला तर आज त्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया जे थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर चांगली कमाई करून गेले.
1. अनफ्रीडम
अनफ्रीडम हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला समलैंगिक संबंध असलेल्या मुलीवर आधारीत आहे. कशा प्रकारे ती भारतात अरेंज मॅरेजच्याविरोधात जाते. 2014 मध्ये हा चित्रपट बॅन करण्यात आला होता पण हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
2. फायर
फायर या चित्रपटात 90 च्या दशकातील समलैंगिक संबंधांवर आधारीत आहे. हा चित्रपट सेंसर बोर्डानं बॅन केला पण हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. परजानिया
3. अंग्री इंडियन गॉडेसेस
या चित्रपटाची पटकथा ही सहा महिलांवर आधारीत आहे. या चित्रपटात असलेले संवाद आणि सीन पाहून सेंसर बोर्डानं त्यातील अनेक सीन्सवर कात्री चालवली आणि त्यानंतर चित्रपट बॅन केला. हा चित्रपट तुम्ही अॅपल टीव्हीवर पाहू शकता. तर हा चित्रपट युट्यूबवर देखील पाहू शकता.
4. वॉटर
जॉन अब्राहमचा हा चित्रपट बनारसच्या एका विधवा महिलेवर आधारीत आहे. बनारसमधल्या वाराणसीच्या एका आश्रमता तिला कशा प्रकारे वागणूक दिली जाते. याविषयी सांगितलं आहे. काही लोकांनी मोर्चा केल्यानं चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आणि चित्रपट कधीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही.
5. लिपस्टिक अंडर माय बुर्का
लिपस्टिक अंडर माय बुर्का या चित्रपाटाला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. या चित्रपटात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलेल्या महिला दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
6. परजानिया
2002 मध्ये गोधरा ट्रेन अग्निकांडनंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगली नंतर एक पारसी जोडप त्यांच्या मुलाला कसं शोधत. यावर हा चित्रपट आधारीत आहे. नसीरुद्दीन शाह आणि सारिका यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही डिज्नी हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता.