Akshara Singh MMS : अभिनेत्री अंजली अरोडा (Anjali Aroda), हंसिका मोटवानी (Hansika Motwani), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) आणि सोहा अली खान (Soha Ali Khan) या अभिनेत्रींचे यापूर्वी MMS लीक (MMS Leak) झाल्यामुळे एकच धुमाकूळ माजली होता. आता पुन्हा एका अभिनेत्रीचा MMS लीक झाल्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग (Akshara Singh) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. सोशल मीडियावर (Social media) दिसणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अक्षरा सिंग असल्याचा दावा करण्यात येतो आहे. तर काही जणांनी हा व्हिडीओ फेक (video fake) असल्याचं म्हटलं आहे. पण यावर अखेर अक्षरा सिंग हिने मौन सोडलं आहे. 


Akshara Singh ने दिलं स्पष्टीकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड लाईफशी बोलताना अक्षरा सिंह म्हणाली, 'कोणी काही पण बोलू द्या. मी अजून व्हिडिओ पाहिला नाही. मी व्हिडिओमध्ये दिसत आहे का? हे सर्व कोण करतंय माहीत नाही. आत्तासाठी, मला काही फरक पडत नाही. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावे.' अक्षरा सिंहनं स्पष्ट केलं आहे की अशा व्हिडिओंचा तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही. 


विशेष म्हणजे अक्षरा सिंगला सोशल मीडियावर अनेक चाहते तिला सपोर्ट करताना दिसतं आहेत. इतकंच नाही तर अक्षरा सिंगला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही यूजर्सने म्हटलं आहे.


मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अक्षरा सिंग असल्याचं अद्याप निश्चित झालेलं नाही. अक्षरा सिंग प्रमाणे अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भोजपुरीची लोकप्रिय गायिका शिल्पी राजचा (shilpi raj) व्हिडिओही समोर आला होता. तरी अभिनेत्री अक्षराने तिच्या चाहत्यांना विनंती केली की, असे व्हिडिओ फॉरवर्ड करू नका आणि त्वरित हटवू नका.