ज्याच्यावर जीव ओवाळून टाकते, त्याच लाडक्या लेकामुळं संतापली Kareena; नेमकं काय घडलं?
अशात एका मुलाखतीत करीना (Kareena ) जेहबद्दल (Jeh) एक प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर करीनाचा राग अनावर झाला.
Kareena Kapoor Khan On Jeh Grumpy Looks: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हे कपल सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. करीना आणि सैफ यांची मुलं तैमूर आणि जेह या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. करीना कपूर खान आणि सैफ अली खान जेव्हा कधीही कुठे बाहेर पडतात तेव्हा ते मुलांसोबत कॅमेऱ्यात कैद होतात. करीना आपल्या मुलांना कॅमेऱ्यासमोर आणताना खूप काळजी घेते.
करीना सहसा तैमूर (Taimir) असो वा जेह (Jeh) यांना लहानपणापासूनच कॅमेऱ्यासमोर जास्त वेळ राहू देत नाही. मात्र तैमूर आणि जेहला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामॅन नेहमी धावपळ करत असतात. तैमूर आणि जेहचे वेगवेगळे क्यूट लूक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड असतात. अशात एका मुलाखतीत करीना (Kareena ) जेहबद्दल (Jeh) एक प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर करीनाचा राग अनावर झाला.
जेह फोटोत चिडखोर का दिसतो? (Jeh Grumpy Looks)
झालं असं की, करीनाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, जेह फोटोमध्ये चिडखोर का दिसतो? हा प्रश्न ऐकून करीनाला राग आला. ती म्हणाला की, जेहला हा प्रश्न तो जेव्हा 18 किंवा 20 वर्षांचा असेल तेव्हा विचारा. आता तो चिडचिड करतो कारण, त्याला कळतं नाही लोक आपले एवढे फोटो का काढतात.
शिवाय या मुलाखतीत करीनाने नवरा आणि मुलांसोबत तिचं समीरकरण सांगितलं. ती म्हणाली की, माझ्या मुलांना हे समजलं पाहिजे की, मी पापा सैफप्रमाणेच काम करते आणि माझंही करिअर आहे. माझ्या मुलांनी हे समजून घ्यायला हवं की मी आणि सैफ आम्ही दोघे नोकरी करणारे पालक आहोत.