मुंबई : मागचे काही दिवस सोशल मीडियावर आपल्या एकच नाव ट्रेंड होताना दिसतंय, ते म्हणजे रणवीर सिंग. बॉलिवूडचा बिंधास्त आणि मजेशीर व्यक्तीमत्व असलेला रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे. रणवीरने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपले न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि तो एक रात्रीत सोशल मीडियावरील हॉट आणि ट्रेंडिंग विषय बनला. त्याचे फोटो जिकडे-तिकडे फिरु लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही तर रणवीरच्या या न्युड फोटोंचे अनेक मीम्स देखील बनवले गेले. अभिनेत्याच्या या फोटोंबद्दल अनेक लोक रणवीरला सपोर्ट करत होते, तर काही लोक त्याला ट्रोल करु लागले आहेत.


खरंतर पेपर मॅगझिनसाठी रणवीरने हे फोटो शुट केलं होतं. त्यावेळी रणवीरचे हे फोटो काढणाऱ्या फोटॉग्रफरने यावर मनमोकळेपणाने वक्तव्य केलं आहे.


कॅमेऱ्याच्या मागे कोण होतं?


रणवीरचे हे चर्चेत असलेले फोटो आशिष शाहने क्लिक केले आहेत. संपूर्ण फोटोशूट वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये झाले.


आशिषने असेही सांगितले की जोपर्यंत तो एखाद्या अभिनेत्यासोबत एक प्रकारचा कम्फर्ट झोन तयार होत नाही तोपर्यंत तो काम पूर्ण होऊ शकत नाही. यापूर्वी, आशिषने पेपर मॅगझिनसाठी हॉलिवूड सेलिब्रिटी किम कार्दशियनच्या फोटोशूटमध्ये देखील काम केले होतं, परंतु रणवीर सिंगसोबतचा हा त्याचा पहिला प्रोजेक्ट आहे.



आपल्या मुलाखतीत आशिषने सांगितले की, रणवीर सिंग त्याच्या शरीराबाबत खूपच कॉन्फीडन्ट आहे. त्याच्यामुळे सेटवर अतिशय आरोग्यदायी वातावरण होते. रणवीर सिंगला माझे काम आधीच माहीत होते. पेपर मॅगझिनही त्याच्यासोबत काम करायला मला फार उत्सुकता होती.


आशिष म्हणाला की, आम्हाला एकमेकांचे काम समजून घेण्याचा एक दृष्टीकोन मिळाला. संपूर्ण चित्रीकरण फिल्म कॅमेऱ्यात करण्यात आले आहे. त्यावेळी रणवीर सिंगला त्याचा एकही फोटो दिसत नव्हता. म्हणजे आधी त्याला माहित नव्हते की, त्याचे फोटो नक्की कसे आलेत. परंतु तरी देखील कॉन्फीडन्ट पणे त्याने हे शुट केले.


सोशल मीडियावर अनेक जण याला ट्रोल करत असतानाच अनेक सेलिब्रिटीही या फोटोंच्या बाजूने आहेत. आशिष शहा आपल्या कामाबद्दल सुरू असलेल्या या गदारोळामुळे उत्साहित आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा असे काम केले जाते तेव्हा त्या कामाला नावं ठेवणारे लोक देखील असतात. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. त्यामुळे आवड आणि नावड या गोष्टी येणारंच.