पुष्पा सिनेमा म्हटलं की 'मे  झुकेगा नही साला 'हा डायलॉग आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही .साऊथचा लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनने 'पुष्पा: पार्ट वन' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर 'पुष्पा: द रुल'वर काम सुरू केलं आहे . निर्मात्यांनी पहिल्या पार्टसाठी एकापेक्षा जास्त अभिनेत्यांना कास्ट केलं होतं. दुसरा पार्ट इंटरेस्टिंग बनवण्यासाठी निर्मात्यांनी इंडस्ट्रीतील प्रतिभावान कलाकारांना कास्ट करण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बातम्यांनुसार निर्मात्यांनी विजय सेतुपतीला चित्रपटात घेतल्याचं समजतं आहे .चित्रपटात विजय सेतुपतीला ऑनबोर्ड घेण्यात आलं आहे तर प्रियामानी या अभिनेत्रीची पुष्पा 2 मध्ये वर्णी लागण्याचं कळतंय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रियामणीने हा चित्रपट साईन केला आहे.


या चित्रपटात अभिनेत्रीला महत्त्वाच्या भूमिकेची ऑफर दिली जातेय.रिपोर्ट्सनुसार,ती या चित्रपटात विजय सेतुपतीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रियामणीने स्क्रिप्ट ऐकली असून तिला ती खूप आवडली असल्याचे बोलले जात आहे.


माहितानुसार विजय सेतुपती या चित्रपटात वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.ऑगस्टच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत .