मुंबई : 'दंगल' सिनेमात आमिर खानच्या मुलीच्या भूमिकेत झळकलेली फातिमा सना शेख पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सना हिनं नुकतंच एक स्विमसूट फोटोशूट केलं... 'दंगल' सिनेमात सलवार-कुर्त्यात दिसणाऱ्या सनाचं हे रूप पाहून अनेक जणांना धक्काच बसला.

फातिमानं मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर एक फोटोशूट केलंय. यामध्य तिनं स्विमसूट परिधान केलाय... 



फातिमा मुस्लिम आहे... आणि सध्या रमजान महिना सुरू आहे... त्यामुळे, समाजातील काही लोकांना तिचं हे फोटोशूट खटकलंय. त्यामुळेच ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसतेय. 

फातिमानं इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केलेत. यामध्ये ती खुर्चीवर बसलेली आहे. परंतु, पवित्र रमजान महिन्यात तीनं अशा पद्धतीचं फोटोशूट करायला नको होतं... असं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केलीय... तर दुसरीकडे अनेकांनी तिचा बचावही केलाय.