मुंबई : अभिनेता रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या खासगी आयुष्यात आलेल्या एका अतिशय महत्त्वच्या वळणामुळे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत रणवीरने लग्नगाठ बांधली असून पुढचे काही दिवस तो आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि दीपिकासमवेतच खास क्षण व्यतीत करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे रणवीरच्या आनंदाला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे मात्र तो काहीसा अडचणीत आल्याचं स्पष्ट होत आहे. 


रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी 'सिम्बा' या चित्रपटामुळे त्याच्या वाट्याला ही कायदेशीर अडचण आल्याचं कळत आहे. 


एका बेव्हरेज कंपनीकडून या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, ट्रेडमार्कच्या वापरावरुन ही याचिका दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. 


दरम्यान, न्यायालयाकडून सदर प्रकरणी सुनावणी करत दिग्दर्शक रोहित शेट्टीला त्याचा पक्ष मांडण्यास विचारण्यात आलं आहे. 


रोहितकडून कोणताच प्रतिसाद न आल्यास ४ डिसेंबर रोजी या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार आहे. 


कॉपीराईट्सच्या अडचणीत आला 'सिम्बा'


रणवीर सिंग, सारा अली खान, सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या सिम्बा या चित्रपटापुढे कॉपीराईट्सच्या वादामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. 


२०१५ पासून, 'सिम्बा' याच नावाने एक कंपनी बियर आणि इतर पेय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देते. त्याशिवाय सदर कंपनीची इतर उत्पादनंही याच नावाने विकली जातात.


दरम्यान, चित्रपटाच्या टीमने आपल्याकडून कोणतीच परवानगी न घेतल्याचं त्या कंपनीचे मालक प्रभतेज भाटिया यांनी स्पष्ट केलं आहे. बऱ्याच महिन्यांपासून आपण चित्रपटात्या निर्मिती संस्थेला आणि कायदेशीर कामकाज पाहणाऱ्या व्यक्तींना मेलच्या माध्यमातून या विषयीची माहिती दिली होती. पण, त्यावर त्यांच्या बाजूने कोणतंच उत्तरप न आल्याचं भाटिया यांनी स्पष्ट केलं. 


सदर प्रकरणी आपल्याला कोणत्याही स्वरुपातील नुकसान भरपाई नको असून, चित्रपटाचं नाव बदलण्याचीच मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.