मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने केलेल्या ट्वीटमुळे सध्या ती चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये भारताचा नकाशा देखील असल्याचं दिसत आहे. बिहारची राजधानी पटना इथल्या खान सर यांचा  व्हिडीओ रवीनानं आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी भारताच्या भौगोलिक सीमा आणि नकाशा राष्ट्रगीतातील काही ओळींवरून कसा लक्षात ठेवायचा हे सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ फेम रवीना टंडनला खान सर यांचा हा व्हिडीओ खूप जास्त आवडला. तिने या खान सरांचा व्हिडीओ पोस्ट करत गुरू असं कॅप्शन दिलं आहे. खान सर हे पटना इथले रहिवासी आहेत. त्यांनी भारतीय नकाशा आणि राष्ट्रगीतातील काही ओळींचं कनेक्शन विद्यार्थ्यांना शिकवताना सांगितलं आहे. 


राष्ट्रगीत आणि त्यातून संपूर्ण भारत कसा लक्षात ठेवायचा याची साधी सोपी ट्रिक ते विद्यार्थ्यांना सांगत असतानाचा हा व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


खान सर यांच्यावर विद्यार्थ्यांना भडकवण्याचा आरोपही लावण्यात आला होता. अटक होण्याच्या भीतीनं ते लपून बसले होते. त्यानंतर मध्यरात्री खान सर यांनी एका व्हिडीओमधून विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन केलं होतं. 


रवीना टंडन हिने सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिला खूप जास्त आवडला आहे ते यावरून दिसत आहे. रवीना हा व्हिडीओ पाहून मनातल्या मनात म्हणत असावी की  ‘तू चीज बड़ी है खान सर'. खान सरांनी ज्या पद्धतीनं भारताचा नकाशा लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगितली ती फार कमाल आहे.