मुंबई : विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला 'तुम्हारी सुलु' या  सिनेमातील नवं गाणं 'हवाहवाई' प्रदर्शित झाल आहे. या गाण्यात विद्याचा निराळा अंदाज बघायला मिळतोयं. श्रीदेवीच्या मिस्टर इंडिया या सिनेमातील 'हवाहवाई'या गाण्याचं हे रिमिस्क व्हर्जन आहे. सिनेमात विद्या 'आरजे'च्या भूमिकेत दिसणार असून एक वेगळा विषय हलक्या-फुलक्या पध्दतीने या सिनेमातून मांडण्यात आला आहे.17 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.