मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा आणि महत्वपूर्ण टप्पा समजला जातो, मग तो कोणत्या मोठ्या स्टारच्या आयुष्यातील असो किंवा सर्व साधारण व्यक्तीच्या आयुष्यातील.  मात्र आता अनेकजण लग्नबंधनात अडकणं टाळतात. बॉलीवूडमध्ये आपण हे खूप पूर्वीपासून पाहत आलो आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच काहीसं आपल्याला जितेंद्र कपूर यांच्या मुलांबद्दल झाल्याचं पाहिलं आहे. एकता आणि तुषार कपूर या दोघांनीही अजून पर्यंत लग्न केला नाहीये. आता तुषार कपूरने, आपला विवाह न करण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. ''मला स्वतःला इतर कोणासोबत देखील वाटायचं नाहीये आणि त्यामुळे मला विवाहच करायचा नाहीये असं तुषार म्हणाला.


'मुझे कुछ केहना है' या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा तुषार कायमच चर्चेचा विषय ठरला. आपल्या पहिल्या सिनेमात त्याला चांगलं यश मिळालं असलं तरीही त्यानंतर इतर कोणत्याही सिनेमामध्ये तो कमाल नाही करू शकला. गोलमाल मध्ये त्याने मूक व्यक्तीची भूमिका साकारली होती आणि त्याला एक नवीन ओळख मिळाली.


प्रत्येक गोलमालच्या भागात त्याचं पात्र, सर्वांना खळखळून हसवतं. सुरुवातीपासूनच त्याचं कोणत्याही अभिनेत्रींसोबत किंवा मॉडेल सोबत अफेअर किंवा रिलेशनशिपच्या बातम्या आल्या नाही. म्हणून ती नक्की कोणासोबत लग्न करणार, याबद्दलची चर्चा वारंवार रंगत होतीच. त्यातच, त्याने सिंगल पालक होण्याचा निर्णय घेतला आणि सर्वच चकित झाले.


नुकतंच त्याने तो कोणत्या कारणामुळे  लग्न करणार नाही याबद्दल सांगितलं आहे. ''मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा विचार ठाम आहे. मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता, तर मी सिंगल पालक झालोच नसतो'' असं तुषार म्हणला. पुढे तो म्हणाला की, ''मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत नवीन काहीतरी शिकत असतो.


याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वतःला इतरांसोबत शेअर करु शकत नाही. त्यामुळे भविष्यातही मी तसं करणार नाही. जर शेवट चांगला, तर सगळंच चांगल. पालक म्हणजे फक्त डायपर बदलणं नाही, तर निस्वार्थ प्रेम, पालनपोषण आणि मुलांना बिनशर्त पाठिंबा देणं असतं'' ४४ वर्षांचा तुषार २०१६ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून वडील बनला.


त्याच्या मुलाचं नाव लक्ष्य आहे आणि तो आत पाच वर्षांचा आहे. तुषारची मोठी बहीण एकता कपूर चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही २०१९ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.