मुंबई : 'झी मराठी' वरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरचा रांगडेपणा प्रेक्षकांना भावला आहे. हार्दिक जोशी म्हणजे राणादा प्रत्येकाला जवळचा वाटतो. यासाठी झी २४ तासने खास राणादाशी गप्पा मारल्या. आणि त्याच्यासोबत गावची मस्त सैर केली. यावेळी राणादाने प्रेक्षकांना आपल्या गावासोबतच घराची देखील सैर करायला लावली. 


झी चोवीस तासचा कॅमेरा राणादा सोबत त्याच्या वाड्यात फिरला. पाहा कसं आहे अंजली आणि राणादाचं घर? राणादाचं घरं हे सेट नसून १४० वर्ष जूना वाडा आहे. या वाड्यातील प्रत्येक गोष्ट खरीखुरी असून मालिकेतील कलाकार हे कायम तिथेच असतात. गेल्या कित्येक महिन्यांपासून या कलाकारांचे वास्तव शुटिंगमुळे तिथेच असल्या कारणाने आता ते त्यांचं खरंखुरं घरं झालं आहे. 



राणादासोबत यावेळी अंजलीची मैत्रिण रेणु, राणाचा मित्र बरकत, अंजलीच्या शाळेची विद्यार्थी आणि मालिकेचे दिग्दर्शक अनिकेत साने देखील उपस्थित होते.