मुंबई :  टी. व्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पत्नी निशा रावलने पती करण मेहरा विरोधात तक्रार दाखल केली.  निशा आणि करण यांच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत आहेत. वाद वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर निशाने पोलीस स्थानकात धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, निशा रावलने सोमवारी 31 मे रोजी गोरेगाव परिसरात करणविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीने मारहाण गेल्याचे आरोप निशाने केले आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून करण मेहराला त्वरित ताब्यात घेण्यात आले आहे. करण आणि निशाच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या लग्ना 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.
 



निशा आणि करण यांना एक 4 वर्षांचा मुलगा देखील  आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नातात्यात कडवटपणा आला आहे.  काहीदिवसांपूर्वी निशाला करणसोबत झालेल्या भांडणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण तेव्हा निशाने काहीही झालं नसल्याचं सांगत उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. आता निशा आणि करणमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. 


करणला 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. या मालिकेच्या माध्यमातून त्याला लोकप्रियता देखील मिळाली. मालिकेत अभिनेत्री हिना खानने करणच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मालिके शिवाय करण 'बिग बॉस', 'नच बलिये 5'मध्ये देखील दिसला होता. तर निशा टीव्ही शो 'शादी मुबारक'मध्ये दिसली होती.