Chhavi Mittal : ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) मागे तिची मुलगी आराध्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती तिच्या मुलीच्या ओठांवर चुंबन देताना दिसली. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. भारतीय संस्कृतीची ऐश्वर्याला आठवण करुन दिली. त्यानंतर मुलांच्या ओठावर किस करणे योग्य आहे की अयोग्य ही चर्चा रंगली. त्यातच अजून एका अभिनेत्रीने मुलाच्या ओठावर किस केली आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. मुलांवरील अशा प्रकारचे अत्याचार थांबवा, असं एका यूजर्सवर त्या फोटोवर कंमेट केली आहे. 


कोण आहे ती अभिनेत्री?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नागिनी 3 फेम छवि मित्तलने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. त्यावरील एक थंबनेल ठेवला होता. ज्यात ती मुलाच्या ओठावर किस (lip kissing) करताना दिसत आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी छवीला धारेवर धरलं. 


यानंतर अभिनेत्रीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या ट्रोलिंगवर तिने सोशल मीडिया अकाऊंटवर अजून मुलांना ओठावर चुंबन घेताना फोटो टाकले. त्यावर तिने एक पोस्टही लिहिली आहे. या फोटोमधील पहिलाच फोटो तिने कमेंट सेक्शनचा स्क्रीनशॉट ठेवला आहे. ज्यात यूजर्सने म्हटलं आहे की, ''मुलांना अशा प्रकारे किस करु नये, हे मुलांचं शोषण वाटतं आहे.'' त्यानंतर तिने मुलगा अरहम हुसैनला लिप किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. 




त्यानंतर तिने मुलगी अरीजालाही किस करतानाचा फोटो टाकला आहे. शेवटी तिने आपलं मत यावर मांडलं आहे. ती म्हणते की, ''एक आई आपल्या मुलांवर प्रेम करते, यावर काही लोकांचा आक्षेप असू शकतो यावर मला विश्वास बसत नाही.'' याशिवाय ती पुढे म्हणते की, ''माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या ओठांवर किस करतानाचे आणखी काही फोटो शेअर करत आहे, कारण त्यांच्यावरील माझ्या प्रेमाची सीमा कशी ठरवायची हे मला कळत नाही''.  अशा प्रकारे तिने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहे. दरम्यान तिच्या या पोस्टला काही यूजर्सने बाजू घेतल्याचंही दिसून आलं आहे.