बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या सेठ शाह (Divya Seth Shah) यांची मुलगी मिहिका शाहचं (Mihika Shah) निधन झालं आहे. कमी वयात मिहिकाने जगाचा निरोप घेतला आहे. मिहिकाची आई म्हणजेच दिव्या सेठ शाह यांनी स्वत: ही बातमी दिली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहिकाचा अचानक मृत्यू झाला. 5 ऑगस्टला तिला ताप आला आणि यानंतर तिला पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे तिचं निधन झालं. मिहिकाच्या अचानक जाण्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. 8 ऑगस्टला तिच्यासाठी प्रार्थनासभा ठेवण्यात आली आहे. 


दिव्या यांच्या मुलीचं निधन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्या (Divya Seth Shah) यांनी फेसबुकला (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे, जी त्यांच्या मुलीची प्रार्थनासभा आहे. या पोस्टवरुन त्यांची मुलगी मिहिकाचं (Mihika) 5 ऑगस्टला निधन झाल्याचं समजत आहे. मिहिराला ताप आला होता आणि नंतर पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे तिचं निधन झालं असं सांगितलं जात आहे. मिहिकासाठी गुरुवारी 8 ऑगस्टला प्रार्थनासभा ठेवण्यात आली आहे. 



मिहिकाचं अचानक निधन झाल्याने बॉलिवूडसह अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करत शोक व्यक्त करत आहेत. तसंच हे नेमकं कधी आणि कसं झालं? याची विचारणा करत आहेत. याचं कारण 29 जुलैला दिव्या यांनी मुलगी मिहिका आणि आई सुषमा सेठ यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिघीही आनंदात दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "डीएनए एकमेव सत्य आहे, इतर सगळं मेहनतीचं काम आहे. मातृत्वाचे आभार".


यानंतर 4 दिवसांनी अभिनेत्रीने आपला आनंदी फोटो शेअर केला होता. अशा स्थितीत मिहिकाला अचानक असं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.