मुंबई - मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री, 'ये हैं मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ती अनेक फोटो शेअर करत असते. पण सध्या दिव्यांकाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. दिव्यांकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर 'सब्यासाची'ला कॉपी केल्याबद्दल तिला ट्रोल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी दिव्यांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने व्हाइट-गोल्डन रंगाचा गाऊन घातला होता. त्या गाऊनसह तिने एक बेल्टही घातला होता. या बेल्टमुळेच दिव्यांका ट्रोल झाली. 'सब्यासाची' या प्रसिद्ध डिझायनरचा रॉयल बेंगाल टायगर हा ट्रेडमार्क आहे. दिव्यांकाने घातलेल्या बेल्टवर अगदी तसाच रॉयल बेंगाल टायगरचा लोगो होता. त्यामुळे सोशल मीडियावरून तिने 'सब्यासाची'ला कॉपी केलं असल्याचं बोललं जात आहे. या ट्रोलनंतर दिव्यांकाने 'मला या ट्रेडमार्कबद्दल काही माहित नव्हतं. त्यासाठी मी सर्वांची माफी मागत असल्याचं' सांगितलं. 



 



दरम्यान, 'डाएट सब्या' या इन्स्टाग्रामवरील यूजरने दिव्यांकाला ट्रोल केलं. या ट्रोलनंतर दिव्यांकाची जवळची मैत्रिण सिनेनिर्माती एकता कपूरने या ट्रोलवर खरमरीत उत्तर दिलं आहे. ट्रोल करणाऱ्या 'डाएट सब्या'ने 'डाएट प्रदा'ला कॉपी केलं आहे. त्यामुळे स्वत: कॉपी करणारा दुसऱ्यावर कॉपी केल्याचे आरोप कसे लावू शकतो असा सवाल एकताने केला आहे.