मुंबई : बॉलिवूड (Bollywood) स्टार्सचं आयुष्य जितकं लखलखणार असतं, तितकाचं त्यांच्या आयुष्यात खुप अंधार असतो.असे अनेकदा अनेक घटनांमधून पाहायला मिळालं आहे.आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीला (Actress) अॅक्टीगची ऑफर (Acting offers) नसल्याने तिच्यावर वाईट परिस्थिती ओढवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अभिनेत्रीकडे काम नसताना तिला काय काम कराव लागलं, ते जाणून घेऊयात. (tv actress ekta sharma tells her struggling story forced to work on call center) 
 
प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) एक उत्तम कलाकार आहे. तिने अनेक उत्तम अभिनय केले आहेत.मात्र तिच्या आयुष्यात एक असा काळ होता ज्यावेळेस ती खुप प्रसिद्धी झोतात होती, त्यानंतर एक असा काळ आला की तिच्याकडे अॅक्टीगच्या ऑफर्सच (Acting offers) नव्हत्या. तिला घर चालवण्यासाठी मग कॉल सेंटरमध्ये (Call center) काम करावं लागलं होतं. कोविड काळात तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाखतीत काय म्हणाली? 
ई-टाइम्सला मुलाखत देताना अभिनेत्री म्हणाली की, 'मला अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. मी खूप संघर्ष केला. मी घरी बसून वाट पहायचे की मला चांगली संधी मिळेल. सतत लुक टेस्ट आणि ऑडिशन देत होते. पण त्या काळात काहीच होत नव्हते, असे ती म्हणाली. 


अभिनेत्री पुढे म्हणाली, दोन दशके टीव्हीसाठी काम करून सुद्घा आज मला काम मिळत नाही ही दु:खद गोष्ट आहे. अशावेळी अॅक्टींगच्या ऑफर्स मिळत नसल्याने कॉल सेंटरमध्ये (Call center) काम करावं लागलं. कॉल सेंटरमध्ये काम करणे ही वाईट गोष्ट नाही. कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते,असे ती पुढे म्हणते. 


अभिनेत्रींनी वडिलांचे मानले आभार 
या मुलाखतीत अभिनेत्रीने (Actress) वडिलांचे आभार मानले आहेत. 'मी माझ्या दिवंगत वडिलांची आभारी आहे. त्यांनी मला अभिनयात जाण्यापूर्वी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून मी माझे शिक्षण पूर्ण केले. आज मी पैसे कमवून स्वतःला सांभाळत असल्याचे तिने यावेळी सांगितले. 


रुपेरी पडद्यावरचं सत्य आणलं समोर 
इतक्या वाईट परिस्थितीत तिला नेमका कोणाचा सपोर्ट मिळाला,याबाबत ती म्हणाली की, मला माझ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना खुप राग येतो,कारण ते कधीच माझ्या मदतीला आले नाही. याउलट माझ्या ऑफिस स्टाफने मला खूप सपोर्ट केल्याचे तिने सांगितले. 


करीअरचं नाही वैयक्तिक आयुष्यातही अडचणी 
प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) केवळ तिच्या करिअरमध्येच (Career)  संघर्ष करत नाहीये. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या.अभिनेत्री तिच्या आठ वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी न्यायालयीन लढा देत आहे.अशा कठीण परिस्थितीतही तिने आशा सोडलेली नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. 


कोण आहे ही अभिनेत्री? 
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' (kyunki saas bhi kabhi bahu thi), 'कुसुम' (Kkusum) आणि 'बेपनाह प्यार' (Bepanah Pyaarr) सारख्या हिट टीव्ही शोमध्ये दिसलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री एकता शर्मा (ekta sharma) आहे.ती बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. सध्या एकता शर्मा तिच्या आईसोबत मुंबईत भाड्याच्या घरात राहत आहे. कोरोना महामारीत तिच्यावर वाईट वेळ आली होती. 


दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री एकता शर्मा (ekta sharma) सोबत घडलेली ही घटना एकूण अनेकांना धक्का बसला आहे.