मुंबई : 'बिग बॉस 15' च्या चाहत्यांना अलीकडेच धक्का बसला जेव्हा त्यांना कळलं की, राकेश बापट शोमध्ये परत येणार नाही. राकेशने काही दिवसांपूर्वी नेहा भसीनसोबत बिग बॉस 15 मध्ये प्रवेश केला होता. जवळजवळ एक आठवडा घरी राहिल्यानंतर, अभिनेता अलीकडेच काही वैद्यकीय कारणांमुळे घरा बाहेर पडला. आता या अभिनेत्याने शोमध्ये परत न येण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वीकेंड का वार'मध्ये सलमानने शमिता आणि प्रेक्षकांना स्पष्ट केलं होतं की, राकेश त्याच्या तब्येतीमुळे 'बिग बॉस'मध्ये परतणार नाही. शमितासाठी ही बातमी जितकी धक्कादायक होती. तितकीच राकेशच्या चाहत्यांसाठीही धक्कादायक होती. त्यामुळे अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक पत्र लिहिलं आहे. राकेशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलयं की, त्याच्या तब्येतीमुळे तो शोमध्ये परत येऊ शकत नाही. अन्यथा त्यानं नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असतं.


अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी तुम्हा सगळ्यांना माझं कुटुंब म्हणतो कारण तुमचं आणि माझं मनापासून बंध आहेत. माझ्या आयुष्यात तुम्ही सगळे मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्या प्रेमाने मला बिग बॉसच्या घरात परत नेलं, पण माझ्या तब्येतीमुळे मी तिथे राहू शकले नाही. 5 वर्षे जुनी समस्या पुन्हा उभी राहिली आहे. ती खूप वेदनादायक आहे. ज्यांना माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यांना मी सांगू ईच्छितो की, मी पूर्वीपेक्षा खूप बरा आहे आणि बरा होत आहे. जसं आपण सगळे म्हणतो की, आरोग्य पहिलं



'या प्रवासादरम्यान मी एक अतिशय मौल्यवान संबंध जोडला ज्याला तुम्ही ShaRa नाव दिलं, तुम्ही सगळेजण आमच्या जीवनाचा एक भाग आहात याचा आम्हाला अभिमान आहे. लक्षात ठेवा, इथे माझी तब्येत नसती तर मी आत्ता घरी तुमची करमणूक केली असती. मला असं कुणाला गुडबाय न बोलता निघून जायचं नव्हतं. पण माझी वेदना माझ्या बाहेर येण्याचं कारण बनली. मी एवढंच म्हणू शकतो की, हा प्रवासाचा एक छोटासा भाग होता. आमचे संबंध कायम राहतील. मी माझ्या पायावर उभा रहण्याचा पुर्णपणे प्रयत्न करत आहे. जेणेकरून मी तुम्हा सगळ्यांचं मनोरंजन करू शकेन. खूप प्रेम राकेश.