नवी दिल्ली : टी.व्ही. पासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयातून आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते मनोज जोशी यांना देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या पुरस्काराने पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला. अभिनेता मनोज जोशी यांची १९९० मध्ये शो चाणक्य मधील व्यक्तिरेखा अजूनही ताजी आहे. ते थिएटर आर्टिस्ट आहेत, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. २००३ मधील हंगामा सिनेमानी मनोज जोशी यांनी बॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. त्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमात विविध ढंगी भूमिकांचा सपाटाच लावला.


मनोज यांच्या गाजलेल्या भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानच्या देवदास सिनेमात त्यांनी शाहरुखच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली. त्यानंतर गरम मसाला, भागम भाग आणि हलचल यांसारख्या सिनेमातून त्यांनी आपली ओळख अजून गडद केली. याशिवाय हलचल, भूल भलईया, फिर फेराफेरी आणि चूपचूप के यांसारख्या सिनेमातील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. त्याचबरोबर टी.व्ही. वरील हॉरर मालिकेतही त्यांनी काम केले. 



या व्यक्तव्यामुळेही चर्चेत


पाकिस्तानी कलाकारांबद्दल केलेल्या व्यक्तव्यामुळेही मनोज जोशी चर्चेचा विषय ठरले होते. त्यावेळेस ते म्हणाले की, पाकीस्तानी कलाकारांचे जे व्हायचे ते होईल पण माझ्यासाठी देश सर्वात महत्त्वाचा आहे.


इतक्या लोकांना करण्यात आले सन्मानित


पद्म सन्मानासाठी निवडलेल्या ८४ लोकांपैकी ४१ लोकांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.