Popular Actress : सोशल मीडियावर एक असं ठिकाण आहे ज्यावरून आपण अनेक वर्षे न भेटलेल्या व्यक्तीला देखील अचानक भेटतो. आपण इथे काय पोस्ट केलं हे आपण कधी कोणच्या संपर्कात नसलेल्या व्यक्तीला देखील कळतं. आपल्या आयुष्यात कधी काय सुरु आहे याची कल्पना सगळ्यांना थोडक्यात येतेच. सोशल मीडिया अनेक व्हिडीओ आपल्याला व्हायरल होत असल्याचे पाहतो. सध्या असाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक 90 वर्षांच्या वृद्ध महिला यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या नदीच्या किनाऱ्यावर भीक मागताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्यांची अवस्था देखील तितकीच बिकट आहे. दरम्यान, या महिला दुसऱ्या कोणी नाही तर 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीची आई असल्याचे समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वृद्ध महिलेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ विषयी स्कुप वूपनं देखील माहिती दिली आहे. त्या वृद्ध महिलेविषयी बोलायचे झाले तर त्यांचे नाव पूर्णिमा आहे. पूर्णिमा या पतीच्या निधनानंतर त्यांच्या मावशीकडे रहायला आल्या. त्यानंतर त्या तिथे गाणं गायला शिकल्या, पेटी वाजवायला शिकल्या. त्यानंतर मंदिरात गेली अनेक दशके भजन गात होत्या. त्या रेडिओवरही गायच्या. त्यावरच त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यांना तिथे मोठा मान होता. आजही तिथले लोक त्यांना मॅडम म्हणून हाक मारतात. पण आता त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबत गायचा मात्र नंतर त्याला लकवा मारला. तर त्यांची मुलगी अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली. त्यांची लेक आज मोठी अभिनेत्री झाल्याचे म्हटले जाते. तिने 'सपने सुहाने लडकपन के' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र त्यानंतर तिने आपल्या आई आणि भावाची विचारपूसही केली नाही. तर त्यांच्या मुलीनं मुंबईत आल्यानंतर तिचं नाव देखील बदललं. इतकंच नाही तर तिनं ती बिहारी नसून गुजराती असल्याचे सांगितलं आहे. 



हेही वाचा : वडिलांच्या निधनानंतर केस का काढले नाही? नेटकऱ्याच्या प्रश्नावर गश्मीर म्हणतो 'तुम्ही जबाबदारी...'


पूर्णिमा यांच्या कुटुंबाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा जावई देखील हा लोकप्रिय दिग्दर्शक आहे आणि नात देखील अभिनेत्री आहे. सगळ्यात लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे काही लोकांनी त्या अभिनेत्रीला तिची आई पूर्णिमा विषयी सांगण्याचा प्रयत्न केला पण तिनं आईला ओळखण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. त्या अभिनेत्रीच्या आईला चालायला देखील त्रास होतोय. इतकंच नाही तर तिच्या भावाची अवस्था देखील बिकट आहे. पण तिला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसल्याचे समोर आले आहे.