मुंबई : अभिनेत्री श्रद्धा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी ती सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 'कुंडली भाग्य' या टीव्ही शोमध्ये सुसंस्कृत अवतारात दिसलेली सर्वांची लाडकी 'प्रिता' तिच्या आगामी सिनेमासाठी सज्ज आहे. नुकताच अभिनेत्रीचा बोल्ड बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये 'प्रीता' टॉवेल  गुंडाळून कॅमेऱ्यासमोर नाचताना दसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रीता' बेडरूममध्ये टॉवेल गुंडाळून नाचू लागली
सोशल मीडियावर, अभिनेत्री श्रद्धा आर्य तिच्या संस्कारी सुनेचा अवतार सोडून बोल्ड अवतारात दिसत आहे. खऱ्या आयुष्यात अभिनेत्री खूप ग्लॅमरस आहे. नुकताच तिने व्हिडिओमध्ये दिला आहे. श्रद्धा आर्यने तिचा एक रील व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, तिला सकाळी लवकर कामावर जायला उशीर का होतो...?


श्रद्धा आर्या फिल्मी स्टाईलमध्ये
या व्हिडीओमध्ये ती फिल्मी गाण्यांवर मस्ती करत हुक स्टेप्स करताना दिसत आहे. एका सीनमध्ये अभिनेत्री गुलाबी टॉवेल गुंडाळून नाचत आहे तर दुसऱ्या सीनमध्ये ती ब्लू प्रिंटेड ड्रेसमध्ये तयार होताना दिसत आहे. या अभिनेत्रीने शाहरुख खानच्या हिट गाण्यावर परफॉर्म करून चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहते अभिनेत्रीच्या या  कौशल्याचं कौतुक करत आहेत.


श्रद्धा आर्या आहे इंस्टा क्वीन 
श्रद्धा आर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अभिनेत्री दररोज तिच्या ग्लॅमरस फोटो आणि रील व्हिडिओंनी चाहत्यांचे मनोरंजन करत असते. श्रद्धाचे बिकिनी फोटोही खूप व्हायरल झाले आहेत. एवढंच नाही तर पती राहुल नांगलसोबतचे रोमँटिक फोटो ती नेहमी शेअर करते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


5 वर्षापासून 'प्रीता'ची भूमिका साकारत आहे
श्रद्धा आर्या दीर्घ काळापासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे मात्र अभिनेत्रीला 'कुंडली भाग्य' या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. अलीकडेच या शोमधून श्रद्धाने तिच्या 10व्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना हसवलं. श्रद्धाच्या विरुद्ध अभिनेता शक्ती अरोरा मुख्य भूमिकेत आहे. गेल्या ५ वर्षांपासून श्रद्धा आर्या या शोमध्ये 'प्रीता अरोरा'च्या भूमिकेत दिसत आहे.