`द कपिल शर्मा` शोमधून सुमोना चक्रवर्ती गायब? पोस्ट शेअर करत व्यक्त केला राग?
टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो `द कपिल शर्मा शो` लवकरच टीव्हीवर कमबॅक करणार आहे.
मुंबई : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो' लवकरच टीव्हीवर कमबॅक करणार आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं असून कलाकारांची नावंही समोर आली आहेत. कपिलने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर सेटवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात कॉमेडियनसह इतर स्टार्सही दिसले होते. त्याचवेळी नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमोदेखील समोर आला होता ज्यात कृष्णा अभिषेक, भारती सिंह, किकू शारदा, चंदन, कपिल शर्मा, सुदेश लाहिरी आणि अर्चना पूरन सिंह दिसले होते, पण या प्रोमोमध्ये शोची लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती दिसली नाही.
आता प्रोमो आणि फोटो समोर आल्यानंतर सुमोनाच्या गायब होण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की, अभिनेत्री शोचा एक भाग आहे की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र यादरम्यान, सुमोनाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात असं दिसत आहे की, ती काही बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. तिच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होत आहे की, कदाचित ती कुणावर तरी नाराज आहे.
सुमोनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, 'जोपर्यंत तुम्हाला ती योग्य संधी मिळत नाही तोपर्यंत ती तुमच्यासाठी बनविली गेली आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. मग ते नातं असो, नवीन नोकरी, नवीन शहर किंवा नवीन अनुभव असो. स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून द्या आणि मागे खेचले जावू नका.
जर ते कार्य करत नसेल तर ते कदाचित आपल्यासाठी बनलं नाहीये, जेणेकरुन आपण दु:ख न करता पुढे जाणं आपल्यासाठी योग्य आहे. आपण हे करू शकता एवढंच... जेव्हा आपल्याला माहिती असतं की, आपण आणखी थोडी मेहनत घेवू शकता, तेव्हा ही एक भयंकर भावना आहे. म्हणून संधी घेण्याचं धाडस करा आणि आपल्या वेगळ्या हालचालीसाठी प्रेरणा शोधा. आणि एकदा आपण ते केल्यावर आपण आपले सगळे कष्ट पणाला लावा आणि नंतर मागे वळून पाहू नका.