मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरी लवकरचं नवा पाहुणा येणार आहे. सुष्मिताचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा (Charu Asopa) लवकरचं त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. ही गोड बातमी खुद्द चारूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंडवरून दिली. आता चारूने बेबी शॉव्हरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'बाळ असणं म्हणजे पुन्हा एकदा प्रेमात पडणं, हे प्रेम तुमच्या पतीसाठी आणि बाळासाठी असतं...' असं लिहिलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारूचे बेबी शॉव्हरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये चारूच्या चेहऱ्यावर आई होण्याचं आनंद झळकत आहे. या कार्यक्रमात जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. 



टीव्ही अभिनेत्री चारू कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. चारू सतत फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. चाहत्यासोबत ही गोड बातमी शेअर केल्यानंतर तिच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेन्ट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 


गेल्या वर्षी चारू आणि राजीव यांच्या नात्यात काही बिनसलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा सुरू होती. पण आता त्यांचं नातं पुन्हा प्रेम आणि आनंदाने फुलणार आहे. जून 2021मध्ये चारू आणि राजीव यांच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण होणार आहे.