Taarak Mehta... फेम अभिनेत्रीशी एजंटचा अश्लील चाळा; त्यानंतर वडिलांसोबत....
या घटनेनंतर अभिनेत्री नैराश्यात..
मुंबई : कलाजगताचा झगमगाट आणि कलाकारांच्या जीवनशैलीचा चाहत्यांना कायमच हेवा वाटतो. एक कलाकार म्हणून नावारुपास येताना ही मंडळी मात्र अशा काही प्रसंगांतून पुढे जातात ज्याचा विचारही आपण करु शकत नाही.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका अभिनेत्रीसोबतही असाच धक्कादायक प्रकार घडला. मालिकेत अगदी लहानशा भूमिकेतून झळकलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे आराधना शर्मा. आराधनानं या मालिकेमध्ये 'दीप्ती'ची भूमिका साकारली होती.
मुळातच बोल्ड असणाऱ्या आराधनाला या क्षेत्रामध्ये कास्टिंग काऊचच्या धक्कादायक प्रकाराचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत तिनं यासंदर्भातील खुलासा केला होता.
'कास्टींग काऊचबाबत खुलेपणाने बोललेल्या या अभिनेत्रीला तिच्या या वक्तव्यासाठी बरंच काही सोसावं लागलं होतं. ती हे सारं पाहूनच हैराण झाली होती. काहींनी तर तिचं करिअरच संपू शकतं असंही वक्तव्य केलं. कास्टिंग काऊचबद्दल बोलणं तिला अशा पद्धतीनं महागात पडत होतं', असं आराधना म्हणाली.
या घटनेनंतर आराधना नैराश्यात...
आराधनानं सांगितल्यानुसार ती एका घटनेनंतर नैराश्यात होती. 'इंडस्ट्री वाईट नाही, पण कास्टींग काऊच हे इथलं सत्य आहे', असं म्हणत आपणही 19 व्या वर्षी कास्टिंग काऊचचा शिकार झाल्याचा गौप्यस्फोट तिनं केला. कास्टिंग एजंटपैकी एकानेच आपल्याशी हा किळसवाणा प्रकार करत आपल्याला चुकीच्या पद्धतीन स्पर्श केल्याचं ती म्हणाली होती.
आपल्याशी झालेल्या या सर्व प्रकाराचा आराधनाचा इतका जबर धक्का बसला, की वडिलांशीही वागताना ती बुझल्यासारखी दिसत होती. या संपूर्ण प्रसंगानं तिला जबर मानसिक धक्का दिला होता.