मुगल-ए-आजम सिनेमाच्या सेटवर असायच्या दोन मधुबाला? एक खरी मधुबाला मग दुसरी ?
`जब प्यार किया तो डरना क्या` गाण्यात दोन अनाकरली होत्या
मुंबई : मुगल-ए-आजम हा सिनेमा आपण तर पाहिलाच असेल. त्यातील अॅक्टिग डान्स देखील तुमच्या आठवणीत असतील. खासकरुन 'जब प्यार किया तो डरना क्या', मात्र त्या गाण्यात दोन अनाकरली होत्या. एक असली आणि एक नकली. सिनेमात मधुबाला यांनी अनारकली ही भूमिका साकारली होती. सिनेमाचं गाणं शूट होणार होतं. मधुबाला यांनी खूप छान डान्स देखील सादर केला होता. ज्याचं आजही कौतुक केलं जातं.
मात्र खुप कमी लोकांना माहिती आहे की, या गाण्यातील अदा मधुबाला यांनी नाही तर कुणी दुसऱ्याने केल्या होत्या. या सेटवर दोन मधुबाला होत्या. दोघांमध्ये असली आणि नकली कोण हे ओळखणं देखील कठीण व्हायचं. जेव्हा गाण्याच्या शूटींगवेळी सिनेमाचे दिग्दर्शक के. असिफ दोन गोष्टींमुळे टेंन्शंमध्ये आले होते. पहिली मधुबाला यांची खराब असलेली तब्बेत. आणि दुसरी त्यांना डान्स करता येत नव्हता
के. आसिफ यांना मधुबालाला सगळ्यात सुंदर डान्सर दाखवायचं होतं. मात्र या दोन गोष्टींमुळे ते चिंतेत होते की, आता करायचं तर काय करायचं. अशावेळी त्यांच्या चिंतेवर उपाय काढण्यासाठी मुर्तीकार बी. आर खेडेकर त्यांना भेटले. त्यांनी त्यांना उपाय सुचवत सांगितलं की, मधुबालाच्या कठिण डान्स स्टेप एका चागल्या डान्संरला करायला द्या आणि तिला मधुबाला यांचा मुखवटा लावा.
खेडेकर यांनी मधुबाला यांना समोर ठेवुन त्यांचा मुखवटा बनवुन घेतला. त्यांनी मधुबाला सारखाच एक मुखवटा देखील तयार केला. तेव्हाच्या प्रसिद्ध डान्सर लक्ष्मी नारायण यांना मधुबाला यांचा मुखवटा घालण्यात आला. जेव्हा त्या हा मुखवटा घालुन सेटवर गेल्या तेव्हा असली मधुबाला यांना ओळखण कठिण होवुन बसलं
असाच एक किस्सा तेव्हा समोर आला जेव्हा दिलिप कुमार यांचा मुखवटा घालुन ज्युनियर आर्टिस्टला पाहून के. आसिफ यांना धोका मिळाला होता. एके दिवशी दिलीप सेटवर दिसले नाही. त्यांचं त्या दिवशी शूट न्हवतं. मग आसिफ म्हणाले, आज तुमची शूट न्हवतं ना? मात्र जेव्हा त्यांनी मुखवटा उतरवला तेव्हा तो कुणीतरी भलताच निघाला. तो एक ज्युनिअर आर्टिस्ट होता. त्यावेळी तिथे असलेले सगळेच जण जोरजोरात हसू लागले.