मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नसला तरी, अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्याने अनेकांना आयुष्य आनंदी जगण्यासाठी नवी उमेद दिली. तर अभिनेत्याच्या काम करण्याच्या पद्धतीने उभरत्या कलाकारांना प्रेरणा दिली. सुशांतच्या 'छिछोरे' सिनेमाने मैत्रीचं महत्त्व पटवून दिलं, तर 'दिल बेचारा' सिनेमाने चाहत्यांना प्रेम करणं शिकवलं. सुशांत स्क्रिनवर ज्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर यायचा तसाचं अभिनेत्याचा स्वभाव होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन प्रवास संपवला. पण अभिनेत्याने नक्की आत्महत्या का केली? हे अद्यापही एक रहस्य आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला तो म्हणजे 'दिल बेचारा..'



सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे अनेकांनी फक्त अभिनेत्याची शेवटची झलक पाहाण्यासाठी सिनेमा पाहिला. पण सिनेमातील काही दृष्य पाहिले तर अनेकांना आपल्या खास व्यक्तीची आठवण आलीच असेल. 


प्रेमावर आधारलेल्या सिनेमाचा ट्रेलर 6 जुलै 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत सर्वांत जास्त लोकप्रियता 'दिल बेचारा' सिनेमाच्या ट्रेलरला मिळाली. अवघ्या 24 तासात जगातील प्रत्येक ठिकाणी सिनेमाचा ट्रेलर सुंशांतमुळे पोहोचला. 


'दिल बेचारा' सिनेमात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघीने मुख्य भूमिका साकारली. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर संजनाने देखील अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर केले. 


आज सुशांत आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी कायम चाहत्यांसोबत असणार आहे. कारण कलाकार कधीचं संपत नाही, त्याची कला कायम त्या व्यक्तीला जिवंत ठेवत असते.