मुंबई : भारतीय आणि जागतिक कलाविश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने कायमच शक्य त्या सर्व वेळी देशप्रेम व्यक्त केलं आहे. निर्भीडपणे आपली मतं मांडणारी ही 'देसी गर्ल' काही दिवसांपासून भारत- पाकिस्तान मुद्द्याविषयी रंगणाऱ्य़ा चर्चावर्तुळांमध्येही दिसत आहे. त्याला कारण ठरत आहे, ते म्हणजे प्रियांकाचं मतप्रदर्शन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत- पाकिस्तान मुद्याविषयी प्रियांकाने भारताच्या भूमिकेचं समर्थन केल्यानंतर पाकिस्तानकडून तिचा तीव्र निषेध करण्यात आला. इतकच नव्हे, तर युनिसेफमध्ये सदिच्छादूतपदी असणाऱ्या प्रियांकाला या पदावरुन हटवावं, अशी मागणीही पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून करण्यात आली. ज्यावर आता थेट युनिसेफचं उत्तर आलं आहे. 


'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, युनिसेफचे महासचिव एंटोनियो गुटेरेसने, प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या उत्तरातून मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी पाकला सडेतोड उत्तर दिलं. 'युनिसेफच्या सदिच्छादूतपदी असणारी एखादी व्यक्ती त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलतात, त्यावेळी अशा वक्तव्यांचा त्यांना पूर्ण अधिकार असतो. हा त्यांचा हक्क असतो. जे आवडीचं आहे, किंवा ज्याविषयी चिंता वाटते अशा मुद्द्यांवर ते बोलू शकतात', असं त्यांनी खडसावलं. 


वैचारिक स्वातंत्र्यांमध्ये युनिसेफ हस्तक्षेप करत नसल्याची महत्त्वाची बाबही त्यांनी स्पष्ट केली. भारतीय सैन्य आणि सरकारच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या 'देसी गर्ल'  प्रियांका चोप्रा हिच्या भूमिकेनंतर, पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी तिच्याविरोधात आवाज उठवला होता.