मुंबई : प्रसून जोशी ११ ऑगस्ट रोजी सेन्सर बोर्डाच्या अध्यक्ष पदी विराजमान झाले. अध्यक्ष झाल्यानंतर प्रसून जोशींच्या खात्यात पहिला सिनेमा आला आणि फिल्म इंडस्ट्रीला पहिला झटका मिळाला. प्रसून जोशी यांच्या अखत्यारित आलेला पंजाबी सिनेमा 'तूफान सिंह' ला CBFC ने बॅन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सेन्सर बोर्डाने पंजाबी सिनेमा 'तूफान सिंह' ला बॅन केल्याच कारण देखील स्पष्ट केलं आहे. या सिनेमाला बाघेल सिंह यांनी दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमाचा हिरो रणजीत बावा असून तो देशातील सिस्टीम आणि राजकारणातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी दहशतवाद्याची मदत घेतो. तर या सिनेमातील अशाच हिंसात्मक कंटेन्ट विरोधात बंदी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तुफान सिंह एका दहशतवाद्याची भूमिका साकारत आहे. जो भ्रष्ट नेता आणि पोलिसांची निर्घुण हत्या करतो. एवढंच नाही तर सिनेमांत तूफान सिंहची तुलना शहीद भगत सिंह यांच्याशी केली आहे. या सिनेमांत भरपूर प्रमाणात क्रूरता दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी घातली आहे. हा सिनेमा ४ ऑगस्ट रोजी परदेशात रिलीज झाला आहे. मात्र सेन्सर बोर्डाने बंदी घातल्यामुळे भारतात याचे भवितव्य धोक्यात आहे.


प्रसून जोशी हे McCann World चे सीईओ देखील आहेत. एवढंच नाही तर McCann World ने मेक इन इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशी कंपन्या आणि जिंगल्सला देखील डिझाइन केलं आहे.