शाहरुखच्या मन्नत बंगल्याची कधीही न ऐकलेली कहाणी, हे आहेत खरे मालक, जाणून घ्या...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे आज जगभरात चाहते आहेत.
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे आज जगभरात चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकं उत्सुक असतात. टीव्हीपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या शाहरुख खानने आपल्या मेहनतीतून आणि संघर्षातून स्वत:साठी एक ब्रँड व्हॅल्यू निर्माण केली आहे. शाहरुख खानने दिल दरिया, फौजी, सर्कस यांसारख्या मालिकांमधून आपला ठसा उमटवला आणि 'दीवाना' या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड जगतात प्रवेश केला.
आज जेव्हा-जेव्हा शाहरुखचा विचार समोर येतो. तेव्हा सर्वात आधी त्याची सक्सेस स्टोरी आधी मनात येते. आणि त्याचं आलिशान घर 'मन्नत' डोळ्यासमोर येतं. शाहरुख खानच्या घरात त्याच्या आधी मन्नतचा रियल ओनर कोण राहत होता हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांच्या आधी ही कोट्यवधींची मालमत्ता कोणाच्या नावावर होती? हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला किंग खानच्या 'मन्नत'ची स्टोरी सांगणार आहोत.
प्रसिद्ध कारागीर आणि गॅलरिस्ट केकू गांधी हे त्यांच्या काळातील खूप श्रीमंत व्यक्ती होते. शाहरुखच्या 'मन्नत'चं नाव आधी 'विला व्हिएन्ना' होतं आणि केकूजी या बंगल्यांचे खरे मालक होते. किंग खानचं हे घर वांद्रे येथील सगळ्यात महागड्या एरिआमध्ये आहे. केकू गांधींची आई व्हिला व्हिएन्ना उर्फ मन्नत येथे राहत होत्या. केकूजींचे आजोबा माणेकजी बाटलीवाला 'केकी मंझिल' मध्ये राहत होते. जो व्हिला ही व्हिएन्ना म्हणजेच मन्नतच्या बाजूला होता.
माणेकजी बाटलीवाला यांनी हे घर मोठ्या उत्साहाने सजवलं होते, मात्र आर्थिक नुकसानीमुळे त्यांना हे मोठं पाऊल उचलावं लागलं. त्यांनी व्हिला व्हिएन्ना भाडेतत्त्वावर दिला आणि नंतर आपल्या कुटुंबासह केकी मंझिल येथे शिफ्ट झाले. अखेरीस, व्हिला व्हिएन्ना हे नरिमन दुबाशच्या नावे झालं. या घरासाठी शाहरुख खानने मोठी रक्कम दिल्याचं बोललं जात आहे. किंग खानला नेहमी या घरात राहायचं होतं. शाहरुखने हे घर नरिमन दुबाशकडून १३.३२ कोटींना खरेदी केलं आहे.
शाहरुखला आधी या घराचं नाव 'जन्नत' ठेवायचं होतं, पण नंतर त्याला वाटलं की हे घर घेतल्यानंतर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे. यानंतर त्यांनी या आलिशान घराचं नाव 'मन्नत' ठेवले.