मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या बोल्ड फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असतात. पण कधी-कधी खऱ्या आयुष्यातही अभिनेत्री त्यांच्या निर्णयांनी वेगळा ट्रेंड सेट करतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट घेऊन आलो आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अनुषा दांडेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे की, ती एका मुलीची आई झाली आहे. लग्नाआधीच आई होण्याच्या बातमीने अनुषाने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. मात्र, अनुषाचे चाहते तिचा हा निर्णय खूपच बोल्ड असल्याचं सांगत आहेत.


अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत तिच्या मुलीसोबतचे अनेक अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की अनुषा सिंगल मदर आहे. अभिनेत्रीने अद्याप लग्न केलेलं नाही.


अनुषा दांडेकर करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ही जोडी चाहत्यांना खूप आवडली. सगळेजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र या कपलच्या ब्रेकअने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. स. ब्रेकअपनंतर करण कुंद्रा तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तर अनुषा सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे.


प्रसिद्ध अभिनेत्री आणि व्हिडिओ जॉकी अनुषा दांडेकर सध्या तिच्या कॉस्मेटिक उत्पादनांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत या प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनसाठी अनुषा रोज एकापेक्षा एक फोटोशूट करून घेते.


ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि तिच्या बोल्डनेसने जवळपास रोजच सर्वांना घायाळ करते. आता पुन्हा अनुषाने असं फोटोशूट केलं आहे की, युजर्स हैराण झाले आहेत. तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने तिचा हॉट अवतार दाखवण्यासाठी तिने आपलं अंग कॅपच्या सहाय्याने लपवलं आहे.


अनुषा दांडेकर फरहान अख्तरची मेहुणी आहे. अनुषाची बहीण शिबानीने याच वर्षी फरहान अख्तरसोबत लग्न केलं.