मुंबई : करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या साखरपुड्यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबातील नातं जवळपास ठरलंच होतं. पण नंतर झालं असं की, ऐश्वर्या रायची अभिषेकच्या आयुष्यात एन्ट्री झाली. त्यानंतर ती बच्चन कुटुंबाची सून झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सिनेसृष्टीतील या छोट्याशा जगात अभिषेक - करिना किंवा करिना - ऐश्वर्या अनेकदा एकमेकींसमोर येत असतात. आता ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात या दोघी एकमेकांच्या समोर आल्या. 


उदयपुरच्या उदयविलास हॉटेलमध्ये संगीतचा कार्यक्रम रंगला. या पार्टीतील अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले. यातील एका व्हिडिओत ऐश्वर्या राय बच्चन आणि करिश्मा कपूर एकत्र मस्तीमध्ये नाचताना दिसत आहेत. 


ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात गायक सुखबीर सिंहने परफॉर्म केलं आहे. 'तारे गिन गिन रात...' आणि 'सौदा खरा खरा' सारख्या पंजाबी धमाकेदार गाण्यावर सुखबीरने सगळ्यांनाच ठेका धरायला लावला. 



याच दरम्यानचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सुखबीर गाणं गात आहे. या गाण्यावर दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या रायने ठेका धरला आहे. या दोघी एकमेकींच्या गळ्यात हात घालून नाचत आहे. 


या गाण्यावर अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या देखील नाचताना दिसत आहे. या व्हिडिओच्या अगदी शेवटी करिश्मा कपूर ऐश्वर्यासोबत नाचताना दिसत आहे. 



हा व्हिडिओ सध्या बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओवरून पुन्हा एकदा करिश्मा - अभिषेक यांच्या नात्याची आणि करिश्मा - ऐश्वर्या यांच्यातील वादाची चर्चा होत आहे.