`मैने प्यार किया` चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर `ही` अभिनेत्री होती पहिली पसंत, `या` कारणामुळे झाली होती रिजेक्ट
सलमान खानच्या `मैने प्यार किया` चित्रपटासाठी ही अभिनेत्री होती पहिली पसंत. परंतु, जास्त उंची असल्यामुळे झाली होती रिजेक्ट. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Maine Pyar Kiya : 'मैने प्यार किया' हा सलमान खान आणि भाग्यश्रीचा चित्रपट आहे. या चित्रपटाला तीन दशके होऊन देखील हा चित्रपट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सलमान खानच्या कारकिर्दीतील हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. ज्यामध्ये त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खानची नायिका निवडण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांनी अनेक अभिनेत्रींच्या ऑडिशन घेतल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत भाग्यश्रीची निवड करण्यात आली होती.
दरम्यान, कपिल शर्माच्या शोमधील ऑनस्क्रीन 'आंटी' म्हणजेच उपासना सिंगने दावा केला आहे की, 'मैने प्यार किया' या चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर ती सूरज बड़जात्याची पहिली पसंती होती, पण तिला चित्रपट सोडावा लागला. सिद्धार्थ कन्ननसोबत बोलताना तिने सांगितले की, या चित्रपटातील भाग्यश्रीची भूमिकासाठी तिने ऑडिशन दिले होते.
उपासना सिंग नेमकं काय म्हणाली?
उपासना सिंगने सांगितेल की, जेव्हा ती पहिल्यांदा मुंबईत आली तेव्हा तिने सूरज बड़जात्या यांना भेटली. पुढे ती म्हणाली सूरज बड़जात्या यांनी मला चित्रपटाबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सर्व काही सांगितले आणि त्यांनी 'मैने प्यार किया' चित्रपटासाठी माझी निवड केली. त्यानंतर सूरज बड़जात्या यांनी तिल्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर उपासना सिंग दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी आली तेव्हा त्यांनी तिला नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा कॉल केला नाही.
अनेक दिवसांनंतर उपासनाने केला खुलासा
उपासना सिंगने त्यानंतर चित्रपटासाठी तिची निवड का झाली नाही याबाबत खुलासा केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, ते एका नायिकेच्या शोधात होते, जी सलमानपेक्षा खूपच लहान असेल. ती पुढे म्हणाली की, बडजात्या यांनी माझी उंची जास्त असल्यामुळे नकार दिला होता. त्यांना सलमानपेक्षा थोडी लहान असलेली नायिका हवी होती, म्हणून त्यांनी मला कास्ट केले नाही. माझ्या जागी त्यांनी भाग्यश्रीला घेतले.