`मध्यरात्री दिग्दर्शकानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...`, उपासना ओरडत म्हणाली; `माझ्या वडिलांच्या वयाच्या...`
Upasana Singh : उपासना सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Upasana Singh : लोकप्रिय अभिनेत्री उपासना सिंगनं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळीकडे काम केलं आहे. उपासनानं कपिल शर्मा शोमध्ये ‘बुआ’ ही भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली. याच शोमुळे उपासना घरा-घरात पोहोचली. उपासना सिंगनं तिच्या कॉमेडीनं प्रेक्षकांची मने जिंकली. आज उपासना तिच्या भूमिकेसाठी किंवा तिच्या कॉमेडीसाठी ओळखत असले तरी तिची 'जुदाई' या चित्रपटातील भूमिका कोणी विसरू शकत नाही. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या 'जुदाई' या चित्रपटातील भूमिकेनं उपासनाला खूप जास्त लोकप्रियता मिळाली होती. आज उपासनाला इतकी लोकप्रियता मिळाली असली तरी तिनं अभिनय क्षेत्रात स्वत: चं स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत केली. एकदा तर तिच्याकडे एका दाक्षिणात्य दिग्दर्शकानं मध्यरात्री फेवर मागितला होता.
उपासना सिंगनं 'ई-टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलविषयी बोलताना एक खुलासा केला आहे. उपासनानं यावेळी त्या व्यक्तीचं नाव न घेता हा सगळा खुलासा केला आहे. उपासनानं सांगितलं की "एका दाक्षिणात्य दिग्दर्शकानं तिला अनिल कपूर यांच्यासोबत कास्ट केलं होतं. तिनं याविषयी तिच्या घरातील लोकांना आणि नातेवाईकांनी देखील सांगितलं होतं. पण मग एक दिवस दिग्दर्शकानं कॉल करुन तिला हॉटेल सिटिंग करण्यासाठी बोलावलं." उपासना म्हणाली त्यावेळी 'ती फक्त 17 वर्षांची होती आणि तिला याविषयी काही माहित नव्हतं.'
पुढे या घटनेविषयी सांगताना उपासना म्हणाली की "तिनं दिग्दर्शकाला सांगितलं की ती उद्या येईल कारण तिच्याकडे हॉटेलला येण्यासाठी काही साधन नाही. त्यावरुन दिग्दर्शकानं उपासनाला सांगितलं की तो कार पाठवेल. त्यानंतर दिग्दर्शकानं उपासनाला विचारलं की तिला सिटिंगविषयी माहित आहे का? चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सिटिंग करावी लागते. त्यावरून दिग्दर्शक काय बोलतोय हे तिला कळलं. त्यानंतर तिनं त्याला खूप सुनावलं होतं. त्यामुळे तिनं अशा प्रकारे अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी गमावली. त्यानंतर ती खूप रडली."
उपासनानं दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला सुनावलं. ती त्याला म्हणाली की 'तो तिला असं काही कसं बोलू शकतो? उपासना दिग्दर्शकाला म्हणाली की तो तिच्या वडिलांच्या वयाचा आहे. त्यानंतर ती खूप रडली आणि पुढचे 7 दिवस ती घराच्या बाहेर निघाली नाही. याकाळात तिच्या आईनं तिला खूप सांभाळलं आणि मग ती कामावर परतली.'