मुंबई : चाईल्ड ट्रॅफिकिंगवर आधारित एक सिनेमा येणार आहे. १२ वर्षांआधी या सिनेमाला सुरूवात झाली होती. या सिनेमातील कथेत लहान मुलांच्या तस्करीवर आणि लैंगिक शोषणावर भाष्य केलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सॉरने या सिनेमातील अनेक सीन्सवर कात्री चालवली आहे. या सिनेमाचं नाव ‘लव सोनिया’ असून या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट देण्यासाठी ४५ कट सांगण्यात आले आहेत. या सिनेमात मनोज वाजपेयी, रिचा चड्डा, मृणाल ठाकूर, राजकुमार राव, अनुपम खेर, फ्रिडा पिंटो आणि सई ताम्हणकर यांच्या भूमिका असणार आहेत. 


सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील अपशब्द हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पहलाज निहलाही यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सिनेमांवर कात्री चालवणे थांबले नाहीये. प्रसून जोशी हे सेन्सॉर बोर्डावर आल्यापासून फिल्ममेकर्स दिलासा मिळेल, असे वाटले होते. पण तसे होताना दिसत नाहीये. 


दिग्दर्शक तबरेज नूरानी यांनी हा सिनेमा बनवण्यासाठी १२ वर्ष वाट पाहिली. इतकी वर्ष वाट पाहिल्यावर सेन्सॉर बोर्डच्या या वागण्याने ते निराश झाले आहेत. या सिनेमासाठी मी खूप रिसर्च केलंय. रेड लाईट एरियात गेलो. काही संस्थांच्या मदतीने अनेक मुलींना तेथून बाहेर काढले. या सिनेमासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.