मुंबई : सगळ्यात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक उर्फी जावेद बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. टीव्ही स्टार असण्याबरोबरच, उर्फी सोशल मीडियाच्या जगात एक मोठं नाव आहे. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्सद्वारे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. मात्र यावेळी तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस ओटीटी मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी जावेदचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये उर्फी जावेद अनेकदा आपलं सौंदर्य फ्लॉन्ट करताना दिसत आहे. उर्फीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर आगीसारखा पसरत आहे. ज्यामध्ये तिचा ड्रेस डान्स करताना खाली उतरत आहे आणि ती तिचा ड्रेस वर घेत आहे. 


खरंतर उर्फी स्टायलिश ड्रेस घालून घराबाहेर पडली. मीडियासमोर तिने चाहत्यांच्या मागणीनुसार डान्स करण्याचा निर्णय घेतला आणि या वेळेत तिचा ड्रेस घसरू लागला. मग काय? उर्फी जावेदनं लगेच तिचा ड्रेस हाताळायला सुरुवात केली. उर्फीचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिला कमेंटमध्ये व्यवस्थित ड्रेस घालण्याचा सल्ला दिला आहे. उर्फीच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की, तिने असा ड्रेस का घातला आहे, जो डान्स दरम्यान सारखा खाली घसरतोय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिने 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात खूप धमाल केली. उर्फी तिच्या बोल्ड आणि फॅशन सेन्समुळे घरावर राज्य करत होती. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत असते. कायम कोणत्या ना कोणत्या ड्रेसमुळे ती ट्रोलही होते. अलीकडे, उर्फी जावेद तिच्या बॅकलेस ड्रेसवरमुळे देखील ट्रोल झाली होती.