मुंबई : बिग बॉस  फेम अभिनेत्री उर्फी जावेद दररोज विचित्र कपड्यांमध्ये दिसते. तिच्‍या लुकमुळे ती खूप ट्रोलही होते. मात्र, यावेळी तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. उर्फी जावेद विमानतळावर ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करताना दिसली. ती थांबली आणि पापाराझींसमोर फोटोसाठी पोज दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्मी वाढली आहे
तिने या विचित्र ड्रेसमध्ये बराच वेळ तिचे फोटोशूट केलं आणि पापाराझींशी मुंबईच्या हवामानाबद्दल बोलली. ती म्हणाली की, उष्णता खूप वाढली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून आता लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कुणी तिला रणवीर सिंगची बहीण म्हणतय, तर कुणी तिला सुधारण्याची सूचना देतय.


लोकांनी प्रचंड ट्रोल केलं
एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलंय की, 'उर्फी जावेदला उलट्या होत नाहीत.' तर एका यूजरने लिहिले की, 'आता एखाद्या दिवशी ती कपड्यांशिवायचएअरपोर्टवर आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.' 



असे कपडे का घालते?
उर्फी जावेद बर्‍याचदा अशा कपड्यांमध्ये बाहेर पडते आणि जवळजवळ प्रत्येक वेळी तिला तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल केलं जातं. जरी अभिनेत्रीने एकदा तिच्या ड्रेसबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे आणि तिने म्हटलं आहे की, ती लक्ष वेधण्यासाठी असे कपडे घालत नाही तर तिच्या आनंदासाठी घालते.