Urfi Javed Video: उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. उर्फी जावेद तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. उर्फीची प्रत्येक पोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. यातील बहुतेक पोस्ट उर्फीच्या विचित्र फोटोशूटमुळे चर्चेत असतात. खरं तर, तिच्या कामापेक्षा उर्फी केवळ तिच्या असामान्य कपड्यांमुळेच चर्चेत असते. पुन्हा एकदा उर्फीने असेच काहीसे केले आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती वायर गुंडाळताना दिसत आहे. तिने यावेळी इलेक्ट्रिक वायरला आपला आउटफिट बनवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी व्हिडीओ


उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये ती आधी निळ्या वायरसोबत दिसत आहे. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तितक्यात ती त्या वायरचा ड्रेस बनवते. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागला. उर्फीने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाइलने लोकांना घायाळ तेले आहे. उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते आणि पुन्हा एकदा तिने असेच काही केले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


उर्फी जावेद अवघ्या 25 वर्षांची 


उर्फीचा हा व्हिडीओ काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे. उर्फी जावेद फक्त 25 वर्षांची आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे चाहते देखील दररोज उर्फीच्या नवीन प्रयोगांची आतुरतेने वाट पाहत असतात.