मुंबई : उर्फी जावेद तिच्या स्टायलिश, ग्लॅमरस आणि युनिक लुकमुळे सर्वाधिक चर्चेत असते. यासोबतच उर्फी जावेद जेव्हाही पब्लिक प्लेसमध्ये जाते तेव्हा ती पापाराझींसोबत संवाद साधताना दिसते. यावेळी उर्फी अशा काही गोष्टी बोलते ज्यामुळे खूप वाद होतात. नुकताच तिचा अजून एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी तिचे मासिक पाळीबाबतचं मत तिने व्यक्त केलं आहे. 


उर्फीची बिघडली तब्येत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच उर्फीला मुंबई विमानतळावर पापाराझींनी स्पॉट केलं. यादरम्यान, उर्फीला पापाराझींनी तिच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारला, ज्यावर उर्फीने अतिशय बोल्डपणे उत्तर दिलं आणि सांगितलं की, तिच्या पीरियड्सचा पहिला दिवस आहे. 



इतकंच नाही तर यादरम्यान उर्फी पीरियड्सशी संबंधित असलेल्या गैरसमजूंतींबाबतही प्रतिक्रिया दिलीये. व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये उर्फी एका व्यक्तीला स्पर्श करते आणि म्हणते, घे हात लावला. 


पुढे उर्फी म्हणते, मासिक पाळीबाबत लोकांचे विचार अजूनही मागासलेले आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 



उर्फीचा ट्रेडिशनल लूक


शुक्रवारी, उर्फी जावेदला पापाराझींनी एअरपोर्टवर स्पॉट केलं. यावेळी तिने पांढर्‍या सूटवर एम्ब्रॉयडरी केलेला निळा दुपट्टा घेतला होता. या ट्रेडिशनल लूकमध्ये उर्फी खूप सुंदर दिसत होती. ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणाऱ्या उर्फीला  पारंपारिक लूकमध्ये स्पॉट केलं गेलं.