Urfi Javed : उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करताना दिसते. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे उर्फी चर्चेत आली होती. मात्र, आता उर्फी चर्चेत येण्याचं कारण तिचा व्हायरल व्हिडीओ किंवा विचित्र फॅशन नाही तर काही वेगळंच आहे. उर्फीनं तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं आहे. मुंबईहून गोव्याला विमानानं येत असताना तिच्यासोबत हा प्रकार झाल्याचं उर्फीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्फीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला आवाज नाही. पण त्यात काही मुलं दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं सांगितलं की मुंबईहून गोव्याला विमानानं जात असताना तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या काही मुलांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगत उर्फी म्हणाली, 'मी मुंबईहून गोव्याला जात असताना मला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. ते माझे नाव घेत माझ्याबद्दल घाणेरड्या भाषेत बोलत होते. मी त्यांना अडवलं तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की त्याचे मित्र दारूच्या नशेत होते. परंतु, स्त्रीशी गैरवर्तन करण्यासाठी कोणतीही सबब असू शकत नाही. तुम्ही नशेत आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्या महिलेशी गैरवर्तन कराल. मी एक पब्लिक फिगर आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही."



उर्फी जावेद, तिचा विचित्र स्टाईल स्टेट्मेंट्साठी ओळखली जाते. नुकतीच उर्फीसोबत अशी काही घटना घडली जी चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फीने तिचा इंस्टवर याबाबत माहिती देत सांगितले कि मुंबईहून गोव्याला विमानाने जात असताना तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या काही मुलांनी उघडपणे तिच्याशी गैरवर्तन केले. उर्फीने तिच्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला, जिथे तिने घडलेल्या प्रकाराबद्दल उघडपणे सांगितले. ही घटना घडली तेव्हा ती मुले दारूच्या नशेत असल्याचे तिने नमूद केले.


हेही वाचा : उर्फी जावेदच्या 'बार्बी' लूकनं वेधलं लक्ष, कपड्यांवर लिहिलेल्या 'त्या' अक्षरांची एकच चर्चा...


उर्फी जावेद तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. मात्र, आता या नुकत्याच घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे, शिवाय सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षतितेवरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. ही घटना 20 जुलै रोजी घडली असून उर्फी त्यावेळी गोव्याला सुट्टीसाठी जात होती. उर्फी ही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होती त्यावेळी तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या मुलांच्या ग्रुपसोबत प्रवास करत होती. या घटनेच्या विरोधात बोलण्यात उर्फीच्या धाडसाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आणि कौतुकही केले.