संडे हो या मंडे रोज खाओ अंडे..! पण एका वर्षात कोंबडी किती अंडी देते?

आहारतज्ज्ञानुसार दररोज अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे जगभरात असंख्य लोक रोज अंडी खातात. पण तुम्हाला माहितीय का? वर्षभरात कोंबडी किती अंडी देते ते..

Sep 23, 2024, 12:12 PM IST
1/7

लहान मुलं असो किंवा मोठे अंडी ही सगळ्यांच आवडतात. कच्चे अंडे, उकडलेले अंडे, ऑम्लेट, एग करी किंवा अंड्यापासून बनवलेले इतर पदार्थ आपण आठवड्यातून अनेक वेळा खात असतो.  

2/7

मासे, चिकन आणि मटण इत्यादी असंख्य लोक खात नाहीत. पण ही लोक अंडी खातात. आहारतज्ज्ञही दररोज अंडी खाण्याचा सल्ला देतात. खास करुन जीमला जाणारे लोक दररोज मोठ्या प्रमाणात अंडी खातात.   

3/7

साधारणपणे, कोंबडीची अंडी जगभरात सर्वाधिक वापरली जातात. कोंबडीशिवाय बदक, टर्की आणि इतर पक्ष्यांची अंडीही खातात, मात्र त्यांची उपलब्धता बाजारात फारशी नाही. तथापि, एका वर्षात कोंबडी किती अंडी घालते याचे उत्तर आपल्याला तज्ज्ञांकडून माहित आहे.दररोज असंख्य लोक अंडी खातात मग कोंबडी वर्षाला किती अंडी देते तुम्हाला माहितीय का?   

4/7

पोल्ट्री शास्त्रज्ञ डॉ. ए.यू. किडवाई यांनी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलंय. कुक्कुटपालनातील कोंबडी एका वर्षात सुमारे 305 ते 310 अंडी घालतात. म्हणजे एक कोंबडी एका महिन्यात सरासरी 25 ते 26 अंडी घालते. मात्र, हा आकडा निश्चितच असेल असे नाही. 

5/7

दरवर्षी घातलेल्या अंडींच्या संख्येत किंचित चढ-उतार पाहिला मिळतो. पोल्ट्री कोंबड्यांव्यतिरिक्त, जर आपण देसी कोंबडीबद्दल बोललो तर ते वर्षभरात केवळ 150-200 अंडी देतात. 

6/7

यूपी पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली अकबर म्हणतात की कोंबड्यांची अंडी घालण्याची क्षमता ही पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या लोकांवर अवलंबून असते. ते कोंबडीची काळजी कशी घेतात, त्यांचे संगोपन कसे करतात, कोंबडी किती निरोगी राहते... या सर्व गोष्टींवरही त्याचा परिणाम होत असतो. 

7/7

त्यांच्या मते, पोल्ट्री फार्मची एक कोंबडी एका वर्षात 300 ते 330 अंडी घालते. तर कोंबडीची 75 ते 80 आठवडे अंडी देण्याची क्षमता असते. याशिवाय काही विशिष्ट जातींच्या कोंबड्याही 100 आठवडे अंडी घालतात. मात्र, कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे उत्पन्नाचे दोन स्रोत आहेत. प्रथम ते अंड्यांचा व्यवसाय करतात, दुसरे म्हणजे ते चिकन/मांसाचा व्यवसाय करतात.