मुंबई : अभिनेत्री उर्फी (Urfi Javed) कायम तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत असते.उर्फीला तिच्या विचित्र कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण आता उर्फी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फी तिच्या पुर्वीच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस ओटीटी फेम उर्फी 'अनुपमा' मालिकेतील अनुपमाच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघे एकमेकांना डेट करत होते. पारस आणि उर्फीने 'दुर्गा' मालिकेत एकत्र स्क्रिन शेअर केली. या दरम्यानचं त्यांच्यात प्रेमाचा गुलाब  फुलला. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. पारस आणि उर्फीने ऑगस्ट 2017 साली एकमेकांना डेट  करण्यास सुरूवात केली. पण दोघांनीही ब्रेकअपच्या चर्चांना कधीही दुजोरा दिला नाही. 



सुरूवातीला माध्यमांसमोर दोघे एकमेकांचं कौतुक करायचे. पण 9 महिन्यांनंतर त्यांच्या नात्याचं 'दी एण्ड' झाला. 2018मध्ये त्यांचं ब्रेक अप झालं. ब्रेकअपनंतर त्यांनी उर्फीने आमचे विचार बिलकूल जुळत नव्हते असं सांगितलं. त्यानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाला. पण पारसने उर्फीसोबत असलेल्या नात्याबद्दल काहीही  सांगितलं नाही. 


उर्फीबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती चर्चेत असलेला विषय म्हणजे उर्फीचे विचित्र कपडे.