`अरे हा तर हिंदुस्तानी भाऊचा चमत्कार`, उर्फीचा Traditional Look पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी उर्फीला हिंदुस्तानी भाऊनं ट्रोल केलं होते. त्यावर उर्फीनं हिंदुस्तानी भाऊला सडेतोड उत्तर दिले होते. दरम्यान, हिंदुस्तानी भाऊनं सुधरण्याचे सांगताच उर्फीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून तिनं आता हिंदुस्तानी भाऊनं सांगितलं ते ऐकले असे सांगितले आहे.
उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. उर्फीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती नववधूच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या उर्फीचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. उर्फीची ही पोस्ट व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत काहींनी तिला ट्रोल केले आहे तर काहींनी तिची स्तुती केली आहे.
उर्फीच्या या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'तू बरी आहेस का?' दुसरा नेटकरी म्हणाला, ''हा चमत्कारापेक्षा कमी नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला,'अरे हा तर हिंदुस्तानी भाऊचा चमत्कार पाहिला.' तर एक नेटकरी उर्फीची स्तुती करत म्हणाला, उर्फी तुझा हा सगळ्यात चांगला लूक आहे.
हिंदुस्तानी भाऊ उर्फीला काय म्हणाला होता?
हिंदुस्तानी भाऊनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हिंदुस्तानी भाऊ म्हणाला, 'जय हिंद... हा मेसेज उर्फी जावेदसाठी आहे. जी स्वतःला प्रसिद्ध फॅशन डिझायनर समजत आहे. जे कपडे घालून तू बाहेर फिरत आहेस, त्यामुळे बहिणी आणि मुलींपर्यंत एक वेगळा मेसेज पोहोचत आहे. तु जे करत आहेस ती आपली हिंदू संस्कृती नाही....'
पुढे हिंदूस्ताना भाऊ म्हणाला, 'मी प्रेमाने सांगात आहे त्यामुळे सुधार नाहीतर मी सुधारेल... एका भावाच्या नात्याने प्रेमाने सांगत आहे. त्यामुळे सुधार...' सध्या हिंदूस्तानी भाऊने व्हिडीओच्या माध्यमातून उर्फीला दिलेली धमकी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.'
हिंदूस्ताना भाऊने दिलेल्या धमकीवर उर्फीचा पलटवार
उर्फी म्हणाली, 'तु जे करत आहेत ती भारताची संस्कृती आहे का. तुझ्या शिव्यांनी किती लोकं सुधारली आहेत. मला फक्त सुधारायलाच नाही तर, बिघडवायला देखील येतं. आता तु मला धमक्या देत आहेस. मी तुला तुरुंगातही पोहोचवू शकते. पण याआधी देखील तू अनेकदा तुरुंगात गेला आहेस. असं उर्फी म्हणाली.
हेही वाचा : Shraddha Murder Case: मेरा अब्दुल ऐसा नही..., श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral
पुढे हिंदूस्तानी भाऊला बजावत उर्फी म्हणाली, 'तुरुंगात जाणं चांगला मेसेज आहे का. सर्वांसमोर मुलींना धमकावने चांगला मेसेस आहे. मित्रांनो याला काही एक फरक पडत नाही. त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी हवी आहे. काही दिवसांपूर्वी माझी मदत करुन प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नान होता. पण मी त्याला नकार दिला...'
'हे सत्य आहे की इंटरनेटवर मला प्रत्येक जण धमकी देत आहे, मला मारण्याची इच्छा अनेकांच्या मनात आहे. अशा लोकांनी मी घाबरत नाही. पण मला माझ्या सुरक्षेची चिंता आहे. जरी त्यांनी काही केलं नाही तरी त्यांच्या विचारांनी प्रभावित होवून इतर लोक मला नुकसान पोहोचवू शकतात....' असं देखील उर्फी म्हणाली.