मुंबई :  लहान ड्रेसेज आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे उर्फी जावेद चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मात्र अलीकडेच उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असा खुलासा केला आहे. की, ऐकून तुम्ही थक्क व्हाल. उर्फीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तिचे नातेवाईक कात्रीने कपडे कापायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेदने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान काही गुपितं उघड केली आहेत. यादरम्यान उर्फी जावेदने आपल्या लोकप्रियतेबद्दल बोलताना सांगितलं आहे की, 'लोकप्रियतेचे संपूर्ण श्रेय पापाराझींना जातं. 


उर्फीच्या लग्नात हे लोकं प्रमुख पाहुणे असतील
उर्फी जावेद पुढे म्हणाली की, 'जेव्हा मी लग्न करेन, तेव्हा सगळे पापाराझी लोकं त्यात प्रमुख पाहुणे असतील. उर्फी फोटो पोस्ट करण्यासाठी पापाराझींना पैसे देते अशा अनेक बातम्या आल्या. या वृत्तांवर मौन तोडत उर्फी म्हणाली की, 'लोक नेहमीच प्रश्न विचारतील. मी मेले तरी प्रश्न उपस्थित करेन. मला या गोष्टींची पर्वा नाही. हे तेच लोकं आहेत जे मला सांगायचे  की, माझ्याकडे विमानाच्या तिकिटासाठी पैसे नाहीत.


उर्फी एकटीच रडते
ट्रोलिंगबाबत उर्फी जावेद म्हणाली की, 'ती महिन्यातून दोन दिवस स्वत:ला देते जिथे ती या गोष्टींबद्दल रडते.'