मुंबई : उर्फी जावेद नेहमीच आपल्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. कधी-कधी फॅशनसोबतच उर्फी तिच्या बोल्ड वक्तव्यामुळेही सगळ्यांच लक्षवेधून घेताना दिसते. एकंदरीत, उर्फीची प्रत्येक गोष्ट सध्या व्हायरल होताना दिसते. मात्र, यावेळी तिच्या फॅशन सेन्ससाठी नाही, तर तिला झालेल्या दुखापतीमुळे तिच्या नावाची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षापूर्वी उर्फी जावेदला खूप त्रास सहन करावा लागला आहे. ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे.


उर्फी जावेदला दुखापत


सोशल मीडियावर नेहमी हसतमुख असणाऱ्या उर्फीने यावेळी आपल्या दुखापतीचे फोटो शेअर केले आहेत. उर्फीला ही दुखापत इतर कोणी नाही तर एका खुर्चीने दिली आहे. फोटो पाहून तिच्या वेदना जाणवणे फार कठीण आहे. इतकी दुखापत होऊनही उर्फी तिच्या चाहत्यांना हसवताना दिसली.


https://akm-img-a-in.tosshub.com/aajtak/styles/medium_crop_simple/public/images/story/202112/2_18.jpg


दुखापतीचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, 'तुम्ही विश्वास ठेवू शकता की एका खुर्चीने हा लव्ह बाईट दिला आहे.'



फोटो पाहून कळते की, दुखापत जास्त आहे, जी बरी व्हायला वेळ लागेल.  उर्फीच्या पाठीवर अनेक खुणा दिसून येत आहेत. सध्या उर्फीने याबाबत फार काही सांगितलेले नाही.



बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद नेहमीच तिच्या आगळ्यावेगळ्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसते.